चाकूर तालुक्यातील जानवळ येथील जनार्धनराव राजेमाने माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तुकाराम पाटील होते. या वेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे मकरंद जाधव, ग्लोबल नॉलेज इंग्लिश स्कूलचे रमेश बिरादार, तालमणी रामभाऊ बोरगावकर, परिमल शिक्षण संस्थेचे बाबूराव जाधव, सच्चिदानंद ढगे, दत्तात्रय पाटील कामखेडकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पस्तापुरे, संस्थाध्यक्ष ॲड. बाळासाहेब माने, पत्रकार शशिकांत पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, शहराध्यक्ष बिलालखाँ पठाण, समाधान जाधव, सचिन तोरे, अनिल वाडकर, संदीप शेटे, माजी सरपंच रणजीत पाटील, मधुकर करडिले, माजी सरपंच रमाकांत चंद्रे, ओमप्रकाश बाहेती, राजू कांबळे, धर्मराज साबदे, पिंटू कर्डिले, उमेश कर्डिले, सुभाष घोडके आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राचार्य नीलेश राजेमाने यांनी, सूत्रसंचालन प्रा. योगेश कदम यांनी केले. आभार देवानंद केंद्रे यांनी मानले. यशस्वितेसाठी प्रा. सोनाळे, प्रा. निचळे, राजकुमार मोरे, रघुनाथ पांचाळ, सतीश शेळके, लक्ष्मीनारायण चंदिले, दिलीप शिंदे, संगमेश्वर कुसनूरे, मुरलीधर मालू, प्रथमेश देशमुख, महादेव बनसोडे, प्रा. चिल्लरगे, प्रा. रणवीरकर, प्रा. गगनबोणे, विजय गिरी, किशोर पवार, लक्ष्मण टोेंपे, पोटे, अंधोरीकर, धनराज कांबळे, कैलास चव्हाण, संताेष जाधव, तपसाळे, नारायण गवळी आदींनी सहकार्य केले.
संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे गरजेचे...
आ. बाबासाहेब पाटील म्हणाले, खेड्या-पाड्यातील, वाडी-तांड्यावरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांचा विकास साधण्याचे कार्य राजेमाने आश्रमशाळेच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे आश्रमशाळेचा लौकिक वाढला आहे. सध्याच्या परिस्थितीत संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे गरजेचे असल्याने शिक्षकांनी त्याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकास साधावा, असेही ते म्हणाले.