अध्यक्षस्थानी उदयगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजकुमार मस्के होते. यावेळी तहसीलदार रामेश्वर गोरे, माजी नगराध्यक्ष प्रा. रामकिशन सोनकांबळे, प्रा. डॉ. मारोती कसाब, ॲड. विष्णू लांडगे, प्रा. राम कांबळे, सचिन शिवशेट्टे, ॲड. श्रवणकुमार माने, अनिता येलमटे, लक्ष्मण बेंंबडे, शिवाजी राजे केंद्रे, विनोद गुरमे, प्रा. शिवाजीराव देवनाळे, प्रा. बालाजी मुस्कावाड, सिध्दार्थ सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
रेणुकादास देवणीकर यांनी उदगीर व जळकोट तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून सेवा करताना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या सेवा पोहोचण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. देवणीकर यांचा शिक्षक ते तहसीलदार असा प्रेरणादायी प्रवास राहिला आहे. तसेच त्यांनी मतदार व निवडणूक प्रक्रियेत केलेल्या अभिनव उपक्रमाची दखल केंद्र व राज्य निवडणूक आयोगाने घेतलेली आहे. प्रास्ताविक रसूल पठाण यांनी केले तर सूत्रसंचालन प्रल्हाद येवरीकर यांनी केले. आभार प्रा. बिभीषण मद्देवाड यांंनी मानले.