केशव रामराव शिंदे (५२, रा. खानापूर) असे मयताचे नाव आहे. खानापूर येथील केशव शिंदे हे गुरुवारी सकाळी मोटारसायकल (एमएच १४, सीटी ११६९) वरून शेतातील पिकांवर फवारणीसाठी बाटलीत पेट्रोल घेऊन निघाले होते. ते पेट्रोल पंपाच्या बाहेर रस्त्यावर येत असताना औरंगाबादहून जाहिराबादकडे पशुधन घेऊन भरधाव वेगाने निघालेला टेम्पो (एमएच २० ईएल ७७८६) ची धडक बसून अपघात झाला. यात दुचाकीवरील शिंदे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी तपासणी करून मयत झाल्याचे सांगितले. हा अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक फरार झाला. याप्रकरणी खानापूरचे पोलीस पाटील राजकुमार शिंदे यांच्या माहितीवरून किनगाव पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मयत केशव शिंदे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आहेत.
टेम्पो- दुचाकी अपघातात, मोटारसायकलस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 4:23 AM