शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

सात वर्षांमध्ये दहा तहसीलदार बदलले; २३ काेटींच्या अपहाराची कोणास आली नाही कुणकुण!

By राजकुमार जोंधळे | Published: January 23, 2023 8:16 PM

लिपिकांचा पराक्रम पण आराेपींचा आकडा वाढण्याची शक्यता...

- राजकुमार जाेंधळे लातूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखा विभागात महसूल सहायकाने केलेल्या तब्बल २२ काेटी ८७ लाख ६२ हजार २५ रुपयांच्या रकमेचा अपहाराचा धक्कादायक प्रकार रविवारी समाेर आला. गत सात वर्षांमध्ये एकूण दहा तहसीलदार बदलले. मात्र, या काेट्यवधींच्या अपहाराची साधी कुणकुण संबंधित यंत्रणेला लागली नाही, हेच माेठे आश्चर्य आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, अपहाराच्या रकमेचा अन् आराेपींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पाेलिसांनी सांगितले, मनाेज नागनाथ फुलेबाेयणे (रा. बाेरी, ता. लातूर) हा जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखा शाखा विभागात लिपिक, महसूल सहायक अव्वल कारकुन पदावर कार्यरत हाेता. त्याच्याकडे विविध प्रकारच्या खरेदीची, विविध शाखा, पुरवठादार यांच्याकडून येणारी देयके तपासून सक्षम प्राधिकार यांच्या मान्यतेने संबंधितांना देयकाचे धनादेश देणे, आरटीजीएस करण्यासाठी बॅंक व्यवस्थापकास निर्देशनपत्र देणे, नाेंदवहीमध्ये नाेंद घेणे, बॅंक व्यवहार हाताळणे आदी जबाबदारी हाेती. मात्र, मनाेज फुलेबाेयणे याने २६ मे २०१५ ते ८ जून २०२२ या कालावधीत बनावट आरटीजीएस तयार करून, तहसीलदारांच्या स्वाक्षरीचे धनादेशातील मूळ रकमेच्या आकड्यात स्वहस्ताक्षरात वाढ करून, असे आरटीजीएस, धनादेश स्वत:च्या, मित्राच्या बॅंक खात्यात जमा केले. तब्बल २२ काेटी ८७ लाख ६२ हजार २५ रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक माहिती समाेर आली. आता काेट्यवधींच्या अपहार कथा तपासात समाेर येत आहेत.

एका लिपिकाचा ‘काेट्यवधीं’चा खेळ...लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याकडून एवढा माेठा अपहार हाेताे, हेच अविश्वसनीय आहे. आता त्याने हा अपहार कसा अन् काेणत्या पद्धतीने केला? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यात किती संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश आहे? हेही तपासात उघड हाेणार आहे. सात वर्षे अपहार उजेडात कसा येत नाही? या प्रश्नाने पाेलिसांनाही चक्रावून टाकले आहे.

धनादेश न वटल्याने फुटले बिंग...२९ मे २०१५ राेजी मनाेज फुलेबाेयणे हा जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखा विभागात रुजू झाला. त्यानंतर ८ जून २०२२ राेजी त्याची औसा येथील तहसील कार्यालयात बदली झाली. ताे औसा येथे गेल्यानंतर मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या बॅंक खात्यातून ९६ हजार ५५९ रुपये काढण्याबाबत धनादेश पाठविण्यात आला. मात्र, खात्यावर आवश्यक ती रक्कम नसल्याने ताे धनादेश वटला नाही. परिणामी, बॅंकेच्या खात्याचे विवरणपत्र (स्टेटमेंट) काढले असता, २३ काेटींच्या अपहाराचे बिंग फुटले.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी