- संदीप शिंदेलातूर : राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद शाळांमध्ये रिक्त जागांसाठी सेवानिवृत्त शिक्षकांना संधी देण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यातील संचमान्यता अंतिम टप्प्यात असून, त्यामध्ये ३५० शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. परिणामी, अतिरिक्त शिक्षकांना पदस्थापना देण्यात शिक्षण विभागाची कसोटी लागली आहे.
जिल्हा परिषदेच्या १२७३ शाळा असून, यामध्ये साडेपाच हजारांवर शिक्षक कार्यरत आहेत. शासनाने राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांवर तात्पुरत्या स्वरूपात सेवानिवृत्त शिक्षकांना २० हजार रुपये मानधनावर संधी देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार जिल्ह्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, जिल्ह्यात ३५० शिक्षक अतिरक्त निघाले आहेत. परिणामी, त्यांनाच संधी देण्यात येणार आहे. परिणामी, सेवानिवृत्त शिक्षकांबद्दल जिल्ह्यात कोणताही निर्णय झालेला नाही.
३५० शिक्षक अतिरिक्त...जिल्ह्यात संचमान्यता सुरू असून, त्यामध्ये ३५० शिक्षक अतिरिक्त ठरले असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.
कोणत्या तालुक्यात जि.प.च्या किती शाळा?तालुका शाळा विद्यार्थीअहमदपूर १७१ ११८७७औसा १७९ १८५६७चाकूर १२४ १०८१५देवणी ६५ ४७३३जळकोट ६४ ५४२७लातूर १६४ १५९७६निलंगा १९२ १८१३४रेणापूर १०९ ७८१३शि.अनंतपाळ ६१ ५४५५उदगीर १४४ १०५५५एकूण १२७३ १०९३५
शिक्षणाधिकारी काय म्हणतात...जिल्ह्यातील संचमान्यता अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत ३५० शिक्षक अतिरिक्त आहेत. त्यामुळे त्यांचे समायोजन करण्यावर शिक्षण विभागाचा भर आहे. सेवानिवृत्तांना संधींबाबत कोणताही निर्णय नाही.- वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी
मागील अनेक वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. त्यात सेवानिवृत्तांना संधी दिली जात आहे. शिक्षक भरती घेऊन तरुणांना संधी द्यावा.- संदीप कांबळे, डी.एड.धारक
शिक्षक भरती घेतल्यास अनेकांना नोकरीची संधी दिली जाणार आहे. मात्र, शासन दिशाभूल करणारे निर्णय घेऊन तरुणांचा भ्रमनिरास करीत आहे.- सुमित सातपुते, डी.एड.धारक