शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

दिग्गज मल्ल घडविणाऱ्या माजी ऑलिम्पियनच्या गावातील तालीम मोजतेय शेवटची घटका!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 6:13 PM

रामलिंग मुदगडच्या तालमीला राजाश्रयाची गरज; तालमीला पुनर्जीवित करण्यासाठी माजी कुस्तीपटूंनी पुढाकार घेतला असून, त्यांनी लातूरच्या प्रशासनाला तालमीचे अंदाजपत्रक काढून प्रस्तावही सादर केला आहे.

- महेश पाळणेलातूर :कुस्तीतलातूरचे नाव सातासमुद्रापार नेणारे रुस्तुमे-ए-हिंद तथा माजी ऑलिम्पियन हरिश्चंद्र बिराजदार यांच्या गावातील तालीम खिळखिळी झाली असून, या जीर्ण झालेल्या तालमीमुळे नवोदित पैलवानांना चितपट होण्याची वेळ या घडीला येऊन ठेपली आहे. ३५ वर्षांपूर्वी तयार झालेल्या या तालमीला राजाश्रयाची गरज असून, जिल्हा प्रशासनाने दुरुस्तीसाठी पुढाकार घेण्याची मागणी गावातील कुस्तीपटूंमधून होत आहे.

निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे १९८२ मध्ये स्थापन झालेल्या हरिश्चंद्र बिराजदार व्यायामशाळेला सध्या घरघर लागली असून, ही तालीम जीर्ण झाली आहे. तालमीतील स्लॅब कमकुवत झाला असून, पावसाळ्यात गळती लागत आहे. यासह दारे, खिडक्या तुटल्या असून, मल्लांच्या निवासासाठी असलेली रूमही मोडकळीस आली आहे. जिल्हा परिषदेच्या निधीतून उभारलेली ही इमारत सध्या शेवटची घटका मोजत आहे. नियमित याठिकाणी जवळपास ३० ते ४० मल्ल दैनंदिन सराव करतात. मात्र, मोडकळीस आलेल्या या तालमीमुळे मल्लांना जीव धोक्यात घालून सराव करावा लागत असल्याचे सध्या चित्र आहे.

याच तालमीतून १९८२ मध्ये म्युनिक येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील लातूर येथील कुस्तीतील तारा हरिश्चंद्र बिराजदार (मामा) यांची जडणघडण झाली. यासह पंढरीनाथ गोचडे, अप्पासाहेब सगरे, मधुकर बिराजदार, नामदेव गोचडे, गुंडाप्पा पुजारी, जीवन बिराजदार, ज्ञानेश्वर गोचडे, सागर बिराजदार यासह नवोदित भैय्या माळी, पवन गोरे, मधुकर दुधनाळे आदी नामवंत मल्ल तयार झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात जुन्या असलेल्या या तालमीला विशेष महत्त्व आहे. ऑलिम्पियन घडलेल्या रामलिंग मुदगड येथील तालमीची ही अवस्था आहे तर बाकी ठिकाणचे काय, असाही प्रश्न उपस्थित होत असून, तालमीची दुरुस्ती व्हावी व नवोदित मल्लांना अद्ययावत तंत्रशुद्ध तालीम तयार करून मिळावी, अशी अपेक्षा गावातील जुन्या कुस्तीप्रेमींसह नवोदित मल्लांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, याच तालमीतून शेकडो राष्ट्रीय खेळाडूंसह अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूही घडले आहेत.

माजी कुस्तीपटूंची तालमीसाठी धडपड....तालमीला पुनर्जीवित करण्यासाठी माजी कुस्तीपटूंनी पुढाकार घेतला असून, त्यांनी लातूरच्या प्रशासनाला तालमीचे अंदाजपत्रक काढून प्रस्तावही सादर केला आहे. तालमीतील दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी, अशी अपेक्षा ठेवून असलेल्या या कुस्तीपटूंना गतवैभव मिळवून देण्यासाठी धडपड सुरू आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधीही रामलिंग मुदगड येथील तालीम दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र, प्रशासनाकडून आतापर्यंत कोणतीही हालचाल झालेली नाही.

मल्लविद्येची खाण रामलिंग मुदगड...रुस्तुमे-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांनी कुस्ती खेळात किमया केली होती. त्यांनी महाबली सतपालला हरवत १९७७ मध्ये इतिहास रचला होता. त्यावेळी त्यांची कोल्हापुरात हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती. यासह त्यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनवीर काका पवार, महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर, रावसाहेब मगर, राहुल काळभोर, दत्ता गायकवाड, राष्ट्रकूल सुवर्णविजेता राहुल आवारे, गोविंद पवार असे मल्ल घडले आहेत. त्यांच्याच गावात तालमीची ही झालेली वाताहत कुस्तीप्रेमींच्या हृदयाला टोचणारी आहे.

टॅग्स :laturलातूरWrestlingकुस्ती