शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

ऑगस्टमध्ये दशकातील सर्वांत कमी पावसाची नोंद ! पाण्याच्या कमतरेमुळे पिकांनी माना टाकल्या

By संदीप शिंदे | Published: August 21, 2023 4:48 PM

ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने पिकांना पाण्याचा ताण बसल्याने फुलगळ वाढली असून, हलक्या जमिनीवरील पिके काेमेजत आहे

औराद शहाजानी (जि.लातूर) : अल निनोचा परिणाम जून व ऑगस्ट महिन्यातील पावसावर झाला असून, या महिन्यात आतापर्यंत केवळ २८.८ मि.मी. पाऊस झाला आहे. मागील दहा वर्षांत सर्वांत कमी पावसाची ऑगस्टमध्ये नोंद झाली असून, पाण्याच्या कमतरतेमुळे शेतशिवारातील सोयाबीनची फुलगळ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतमालाचा उतारा मोठ्या प्रमाणात घटणार आहे.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी मंडळामध्ये यावर्षी खरीप हंगामात ४२ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून, सुरुवातील पावसाने खंड दिल्यावर जुलैमध्ये पाऊस झाल्यावर पेरण्या पूर्ण झाल्या. केवळ रिमझिम पाऊस असल्याने त्यावरच पिकांनी तग धरली आहे. मात्र, मागील २९ जुलैपासून परिसरात पाऊस नसल्याने पिकांची फुलगळ सुरू झाली आहे. पिकाची वाढ खुंटली असून, फुलगळ होत असल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. दरम्यान, वरून पिके हिरवीगार दिसत असली तरी आतून निस्तेज झाली आहेत. परिणामी, यावर्षीचा खरीप हंगाम धोक्यात आला असल्याचे शेतकरी नागेंद्र पाटील यांनी सांगितले. तसेच, ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने पिकांना पाण्याचा ताण बसल्याने फुलगळ वाढली असून, हलक्या जमिनीवरील पिके काेमेजत आहे, असे औराद शहाजानी कृषी मंडळ अधिकारी रणजित राठोड यांनी सांगितले.

बाजारात शेतमालाची आवक घटली...मागील वर्षी सोयाबीनचा उतारा घटला होता. त्यामुळे बाजारात आवक कमीच होती. आता सुद्धा शेतमालाची आवक अत्यल्प असून, पावसाचा खंड असल्याने सोयाबीनचा उतारा घटणार आहे. त्यामुळे पुढील हंगामातही आवक जेमतेम राहील असे, आडत व्यापारी सतीश देवणे यांनी सांगितले.मागील पाच वर्षांतील ऑगस्टच्या नाेंदी...२०२३ - २८.८ मि.मी., २०२२-११७ मि.मी., २०२१- १८८ मि.मी., २०२०- १०९ मि.मी., २०१९- २२७.८ मि.मी., २०१८-१२९.६ मि.मी., २०१७- ३१६ मि.मी, २०१६-६३.४ मि.मी. पाऊस झाला आहे. १९७२ मध्ये पूर्ण वर्षभरात केवळ १०९ मि.मी. पाऊस झाला होता. तर, यंदाच्या ऑगस्ट महिन्यात केवळ २८.८ मि.मी. पावसाची नाेंद झाली असल्याचे औराद शहाजानी हवामान केंद्राचे मापक मुक्रम नाईकवाडे यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीRainपाऊस