शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकहिताचा निर्णय रद्द कराल, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम होईल; CM शिंदे यांचा विरोधकांना इशारा
2
Video - भयंकर! नायजेरियात पेट्रोलचा टँकर उलटल्याने भीषण अपघात; १४७ जणांचा मृत्यू
3
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, येणी वसूल होतील; मन प्रसन्न होईल, शुभ फलदायी दिवस
4
संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम
5
आतापर्यंत 1,658 महिला लढल्या, पण विजयी झाल्या फक्त 161
6
विधानसभा जिंकू आणि सत्ता आणू : राज ठाकरे
7
महायुती सरकारचे विकासाचे दावे खोटे; नाना पटोलेंची टीका
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, महागाई भत्ता ३% वाढला
9
जीआरमुळे आचारसंहिता भंग झाली का, ‘व्होट जिहाद’ शब्दही तपासणार - चोक्कलिंगम 
10
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली; हातात तलवारीऐवजी संविधान!
11
काँग्रेसची ६० नावे निश्चित! छाननी समितीची दिल्लीत चर्चा; २० तारखेनंतर येणार पहिली यादी
12
शेतकऱ्यांना माेठा दिलासा, सरकारने वाढविले दर; गव्हाच्या एमएसपीमध्ये १५० रुपये वाढ
13
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
14
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
15
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
16
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
17
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
18
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
19
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा

‘हर हर महादेव’च्या जयघोषाने निळकंठेश्वर यात्रेची सांगता 

By संदीप शिंदे | Published: September 11, 2023 1:44 PM

किल्लारी येथील ग्रामदैवत श्री नीळकंठेश्वर यात्रा ११ दिवसांपासून सुरू होती.

किल्लारी : टाळ-मृदंग, ढोल-ताशांचा गजर आणि हाती पताका घेऊन हर हर महादेव, शिव-शिव सांब सदाशिवचा जयघोष करीत श्री नीळकंठेश्वराची रविवारी दुपारी पालखी मिरवणूक झाली. यावेळी हजारो भाविकांनी दर्शन घेतले. आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, असे म्हणत यात्रा महोत्सवाची उत्साहात सांगता झाली.

किल्लारी येथील ग्रामदैवत श्री नीळकंठेश्वर यात्रा ११ दिवसांपासून सुरू होती. यात्रेनिमित्त दर्शन व नवस पूर्ण करण्यासाठी जिल्ह्याबरोबर राज्यातील तसेच कर्नाटकातील भाविकांची रीघ लागली होती. रविवारी क्रीडामंत्री संजय बनसोडे, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, हुमनाबादचे आ. सिद्धु पाटील यांच्या हस्ते पुजा करुन पालखी सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. दिंड्या, पताका घेऊन, टाळ- मृदंग, ढोल-ताशांच्या गजरात हर हर महादेव असा जयघोष करीत पालखी पुनर्वसित गावात दाखल झाली. दरम्यान, पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पालखीच्या स्वागतासाठी मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती. रविवारी यात्रा सांगतावेळी सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत सुलतानपुर येथील ह.भ.प. बस्वराज बिराजदार व त्यांच्या संघाचा भारुडाचा समाजप्रबोधनपर कार्यक्रम झाला. त्यानंतर जुनी किल्लारी ते पुनर्वसित किल्लारी अशी ५ किमीची पालखी मिरवणूक निघाली. हा पालखी सोहळा एक किमी लांब होता. टाळ- मृदंगाच्या गजरात भाविक तल्लीन होऊन नाचत होते. तसेच महिला, पुरुष भाविकांनी फुगडीचा घेरही धरला. या सोहळ्यासाठी पंधरा ते २० हजार भाविक उपस्थित होते. तर यात्रा कालावधीत जवळपास ५ लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचे देवस्थान समितीने सांगितले.

भाविकांसाठी मोफत वाहन सेवा...किल्लारी येथील श्री निळकंठेश्वर यात्रा मोफत प्रवासी सेवा संघटनेतर्फे सुर्यकांत बाळापुरे, जनार्धन डुमने, बालाजी चव्हाण, विक्रम भोसले यांच्या संयोजनाने भास्कर माने, गणेश कांबळे, संजय दंडगुले, संतोष दुधभाते, इश्वर साखरे, राजु डूमने, परमेश्वर साखरे आदींनी आपल्या वाहनाद्वारे मोफत प्रवासी सेवा बजावली. यात्रा काळात सुत्रसंचलन राजेंद्र जळकोटे यांनी केले. तर उपविभागीय पोलीस अधिकारी इंगाेले, सपोनि नानासाहेब लिंगे, पीएसआय प्रशांत राजपुत, अशोक ढोणे, एस.आर.माने, ए.पी ढोणे, आबासाहेब इंगळे, किसन मरडे, सचिन उस्तुर्गे, शितलकुमार सिंदाळकर, मुरली दंतराव, कृष्णा गायकवाड, धनराज कांबळे, आबा इंगळे, बी.बी. कांबळे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला.

यात्रा कालावधीत विविध उपक्रम...यात्रा कालावधीत रक्तदान, चित्रप्रदर्शन यासह विविध उपक्रम राबविण्यात आले. यशस्वीतेसाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गावकरे, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, चंद्रकात बाबळसुरे, मनोहर गवारे, सुभाष लोहार, नामदेव माळवदे, निळकंठ बिराजदार, बिसरसिंग ठाकुर, शिवराम कांबळे, शरण पाटील, विजय बाबळसुरे, बाळु गावकरे, राजेंद्र जळकोटे, देविदास मिरकले, अंकुश भोसले, शरण पाटील, पप्पु भोसले, शिवशंकर जळकोटे, शिवराज जळकोटे, प्रशांत गावकरे, तानाजी चाकुरे, भारत बोळशेट्टे, संजय गावकरे, राजु बिराजदार, श्याम घोरपडे, मल्लिकार्जुन उमाटे, देवाचे पहारेकरी मंडळ यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :laturलातूर