शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
2
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
3
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
4
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
5
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
6
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
7
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
8
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
9
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
10
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
11
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
12
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
13
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
14
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
15
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
16
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
17
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
18
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
19
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
20
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान

सेवालयामध्ये सुरू झाली लगीनघाई; एचआयव्ही संक्रमित पाच जाेडप्यांचे विवाह जुळले !

By राजकुमार जोंधळे | Published: April 17, 2023 7:10 PM

सेवालयाचा पहिला लाभार्थी अडकणार विवाहबंधनात...

लातूर : लातूर शहरानजीक हासेगाव (ता. औसा) येथील सेवालयात असलेल्या एचआयव्ही संक्रमित पाच सज्ञान जोडप्यांचे विवाह जुळविण्यात आले आहेत. त्यांचा सामूहिक विवाह सोहळा शनिवार, २२ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता सेवालयाजवळील हॅप्पी इंडियन व्हिलेज येथे होणार आहे.

एचआयव्ही संक्रमित बालकांचा सांभाळ करण्यासाठी लातूरनजीक हासेगाव येथे प्रा. रवी बापटले यांनी २००७ मध्ये सेवालय नावाचा प्रकल्प सुरू केला. त्यावेळी सेवालयात दाखल झालेली बालके आता सज्ञान झाली आहेत. आतापर्यंत १८ जणांचे विवाह झाले असून, सात जोडपे हॅप्पी व्हिलेजवर राहत आहेत. या जोडप्यांना एचआयव्ही मुक्त मुलं जन्मली आहेत. आज त्यांचे संसार सुखाने सुरू आहेत. आता अन्य एचआयव्ही संक्रमित सज्ञान पाच जोडप्यांचे विवाह प्रा. रवी बापटले यांनी जुळविले आहेत. ते विवाह येत्या शनिवारी, २२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहेत.

यावेळी वधू-वरांचे पालक म्हणून औशाचे आमदार अभिमन्यू पवार, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, डॉ. अशोक गाणू, डॉ. हनुमंत किणीकर, प्रिया लातूरकर, प्रा.डॉ. रुपाली गोरे, अॅड. दीपक बनसुडे, डॉ. पवन चांडक, राजकुमार महाशेट्टे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. एचआयव्ही संक्रमित सज्ञान वधू-वरांच्या सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन सेवालय परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

सेवालयाचा पहिला लाभार्थी शहाजी अडकणार विवाहबंधनात...प्रा. रवी बापटले यांनी २००७ मध्ये एचआयव्ही संक्रमित अनाथ मुलांच्या सांभाळासाठी सेवालय हा प्रकल्प सुरु केला. त्यानंतर पहिल्यांदा येथे शहाजी नावाच्या बालकाचे आगमन झाले. दिसायला अतिशय गोंडस, मितभाषी असणारा शहाजी हळूहळू सर्वांचा लाडका झाला. त्याच्या प्रवेशानंतर आज सेवालयात सुमारे १०० पेक्षा अधिक एचआयव्ही संक्रमित बालके आणि सज्ञान मुले-मुली वास्तव्याला आहेत. पहिला लाभार्थी असलेला शहाजी आता २३ वर्षांचा झाला आहे. त्याचाही विवाह या सामूहिक विवाह सोहळ्यात होणार आहे.

टॅग्स :laturलातूरHIV-AIDSएड्सSocialसामाजिक