वाहनावर दंड आहे का, या अॅपवर शाेधावा !
१ आपल्या वाहनावर दंड आहे किंवा नाही याचा शाेध महाट्रॅफिक अपवर शाेधता येइल. यातून आपल्या वाहनाला दंड केला आहे किंवा नाही. हेही पाहता येणार आहे.
२ याबाबत काही तक्रार असेल तर याच अॅपवरुन ऑनलाइन तक्रारही करता येणार आहे. यासाठी पाेलीस प्रशासनाने हे अॅप अस्तित्वात आणले आहे.
थकीत दंड भरणे बंधनकारक...
एखाद्या वाहनावर दंड आकरण्यात आला असेल, त्याबाबतचा ऑनलाइन मेसज, एसएमएस आला असेल तर तातडीने ताे दंड भरुन घेतला पाहिजे. अन्यथा वाहनधारकांवर ती थकबाकी दाखविली जाते. यातून भविष्यात वाढणाऱ्या दंडाची रक्कम माेठी झाली तर, वाहन हंस्तातरण करताना अडचणी येतात. यासाठी झालेला दंड तातडीने ऑनलाइन अथवा जवळच्या पाेलीस ठाण्यात भरावा. - सुनील बिर्ला, पाेलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, लातूर