शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

चार महिन्यांपासून अनुदानाचा छदामही नाही; ५३ कोटी थकल्याने लाभार्थी आर्थिक संकटात!

By हरी मोकाशे | Published: August 09, 2024 6:42 PM

उसनवारी करुन बांधकाम साहित्याची खरेदी

लातूर : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांची प्रगती व्हावी म्हणून मग्रारोहयोअंतर्गत विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. मात्र, चार महिन्यांपासून बांधकाम व अन्य आवश्यक साहित्याचे ५३ कोटी ५३ लाखांचे अनुदान थकित राहिले आहे. दरम्यान, काही लाभार्थ्यांनी वेळेवर अनुदान मिळेल, या आशेने उसनवारी केली. परंतु, अनुदानापोटी शासनाकडून छदामही मिळाला नसल्याने आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाकडे वारंवार चौकशी करीत आहेत.

ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळावे आणि त्यातून शेती उपयोगी, पाणीपुरवठा, दळणवळण, पर्यावरण संवर्धनाची कामे व्हावीत व शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून केंद्र शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येते. या योजनेचा मजूर, शेतकऱ्यांना चांगला लाभ झाला आहे. त्यामुळे मग्रारोहयोअंतर्गतच्या कामांकडे अधिक लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. योजनेअंतर्गत दर आठवड्यास कामाचे मोजमाप करुन मजुरांना मजुरी दिली जाते तर अकुश म्हणजे आवश्यक साहित्यापोटी अनुदान देण्यात येते.

मग्रारोहयोअंतर्गत विविध ११ कामे...मग्रारोहयोअंतर्गत बांबू, वृक्ष लागवड, जनावरांचा गोठा, शेततळे, वैयक्तिक व सामुहिक सिंचन विहीर, रोपवाटिका, तुती लागवड, रस्ते, ग्रामपंचायत भवन, दुतर्फा वृक्ष लागवड, सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर अशी ११ प्रकारची कामे करण्यात येतात. या कामांसाठी रोपे, विटा, वाळू, सिमेंट, सळई अशा कामांसाठी कुशल म्हणून निधी देण्यात येतो.

सिंचन विहिरींचे १३ कोटी रखडले...कामाचा प्रकार - थकित रक्कमबांबू, वृक्ष लागवड - १० लाख ६ हजारजनावरांचा गोठा - १० कोटी ७० लाखशेततळे - २१ लाख ५५ हजारसिंचन विहीर - १२ कोटी ९६ लाखरोपवाटिका - ४ लाख ४४ हजारतुती लागवड - ३ लाख १५ हजाररस्ते - २८ कोटी ९९ लाखग्रामपंचायत भवन - ४२ लाख ४५ हजारशोषखड्डे - १ लाख ८४ हजारवृक्ष लागवड - ४५ हजारसार्वजनिक पाणीपुरवठा विहीर - ३ लाख ३९ हजारएकूण - ५३ कोटी ५३ लाखतालुका - प्रलंबित निधीअहमदपूर - २,४१,४८,०६०औसा - ५,४१,१७,३९७चाकूर - १०,९१,६८,३६८देवणी - ५,९५,७७,१९४जळकोट - १,३०,६०,९७२लातूर - ९,२५,१७,८६२निलंगा - ८,३६,३२,६९२रेणापूर - ४,५०,४५,१७१शिरुर अनं. - ३३,२६,१६४उदगीर - ५,०८,०३,११६एकूण - ५३,५३,९६,९९७

उसनवारी करुन गोठा बांधला...पशुधनाच्या संरक्षणासाठी मग्रारोहयोअंतर्गत गोठा बांधला. अनुदानापेक्षा अधिक प्रमाणात पैसा खर्च झाला. वेळेवर अनुदान मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, चार महिन्यांपासून अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याने मोठी अडचण झाली आहे. शासनाने लवकरात लवकर अनुदान द्यावे.- अर्जुन उटगे, हरंगुळ बु.

गोठा बांधल्यामुळे पेरणीला पैसे नव्हते...मग्रारोहयोअंतर्गतच्या कामाचे वेळेवर पैसे मिळतात म्हणून शेतात गोठा बांधला. मात्र, अनुदानाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे खरीप पेरणीवेळी अडचण निर्माण झाली. तेव्हा उसनवारी करावी लागली. शासनाने अनुदानाचे लवकर वितरण करावे.- नागेश वाघमारे, हरंगुळ बु.

शासनाकडे अनुदानाची मागणी...मग्रारोहयोअंतर्गत अनुदान ऑनलाईनरित्या जमा होतात. काही दिवसांपासून कुशलचे अनुदान थकित राहिले असल्याने शासनाकडे अनुदान मागणी केली आहे. निधी प्राप्त होताच लाभार्थ्यांना कळविण्यात येईल.- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

टॅग्स :laturलातूर