शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
2
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
3
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
4
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
6
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
8
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
9
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
10
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
11
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
12
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
13
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
14
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
15
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
16
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
17
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
18
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
19
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
20
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान

तिसर्‍या टप्प्यात ७ कोटी ७ लाख जमा

By admin | Published: May 27, 2014 12:26 AM

विठ्ठल कटके, रेणापूर तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे १४ हजार २३ हेक्टर्स क्षेत्रावरील पिके वाया गेली होती. या नुकसानीची झळ साडेछत्तीस हजार शेतकर्‍यांना बसली.

 विठ्ठल कटके, रेणापूर तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे १४ हजार २३ हेक्टर्स क्षेत्रावरील पिके वाया गेली होती. या नुकसानीची झळ साडेछत्तीस हजार शेतकर्‍यांना बसली. शासनाने यापूर्वी ३६ गावांच्या १५ हजार शेतकर्‍यांना ८ कोटी २८ लाखांचे अनुदान दोन टप्प्यांत वाटप केले. तिसर्‍या टप्प्यातील १२ हजार ६९४ शेतकर्‍यांचे ७ कोटी ७ लाख २८ हजार रुपयांचे अनुदान शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती तहसीलदार संजय वारकड यांनी दिली. तालुक्यात फेब्रुवारी-मार्च २०१४ मध्ये वादळी वार्‍यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. त्रिसदस्यीय समितीने पिकांचे पंचनामे केले. पंचनाम्यानुसार १५ कोटी ४९ लाख रुपये तालुक्यासाठी मंजूर झाले. यापूर्वी पहिल्या टप्प्यात व दुसर्‍या टप्प्यात प्रत्येकी १८ अशा एकूण ३६ गावाला ८ कोटी २८ लाख रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. त्यात १५ हजार ८५९ शेतकर्‍यांचा सहभाग होता. आता तिसर्‍या टप्प्यातील १२ हजार ६९४ शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर सोमवारी ७ कोटी ७ लाख २८ हजार रुपये जमा करण्यात आले. पहिल्या टप्प्यात आरजखेडा ४२२ शेतकर्‍यांना २३ लाख ९० हजार ३०० रुपये, आंदलगाव-१८८ शेतकर्‍यांना ६ लाख २९ हजार २५०, आसराचीवाडी- १९२ शेतकर्‍यांना ५ लाख २६ हजार ५००, बावची- ३८५ शेतकर्‍यांना २५ लाख १० हजार, भंडारवाडी-३५१ शेतकर्‍यांना २० लाख ४१ हजार, भोकरंबा येथील ६२३ शेतकर्‍यांना ३६ लाख २९ हजार ७५०, बिटरगाव-१११६ शेतकर्‍यांना ६१ लाख ९ हजार ७५०, चाडगाव-२५६ शेतकर्‍यांना १३ लाख ६९ हजार ५००, दर्जी बोरगाव- ८०० शेतकर्‍यांना ३३ लाख १५००, डोमगाव-४४४ शेतकर्‍यांना ३० लाख ६९ हजार ७५०, धवेली-३५७ शेतकरी : २५ लाख ५२ हजार ५००, डिगोळ देशमुख- ५१३ शेतकरी : २४ लाख ३० हजार, डिगोळ देशपांडे- १९७ : ७१ लाख ९ हजार, दिवेगाव- (१०) १ लाख ९ हजार, फरदपूर (२६५) ९ लाख, फावडेवाडी- (२७०) ११ लाख ७५ हजार ५००, गरसुळी (३९४) २६ लाख १३ हजार ५००, गव्हाण (४१५) १६ लाख ९१ हजार ७५० असे एकूण ३ कोटी ७८ लाख रुपये वाटप करण्यात आले. दुसर्‍या टप्प्यातील गावे व शेतकरी (कंसात) घनसरगाव (५४९) २९ लाख ८१ हजार ५००, गोढाळा- (२१) ३ लाख ३९ हजार, हरवाडी- (४२०) १९ लाख ९१ हजार, इंदरठाणा (३३६) १० लाख ८८ हजार, इटी-(३२५) १९ लाख २६ हजार, जवळगा-(६८९) २६ लाख २१ हजार, कामखेडा- (६९२) ४१ लाख ९६ हजार, कारेपूर- (९०१) ३२ लाख ९४ हजार ५००, खानापूर- (२६३) ८ लाख ७१ हजार ७५०, खरोळा- (२०४५) १ कोटी ७ लाख ४३ हजार ५००, कोळगाव- (४१८) १६ लाख ६० हजार ७००, कोष्टगाव- (७) ५९ हजार, कुंभारी- (२६९) ९४ लाख ६९ हजार २५०, लखमापूर- (३२७) १५ लाख ९१ हजार, मोहगाव- (२५०) १६ लाख ८४ हजार, माणूसमारवाडी- (३३१) १७ लाख ७२ हजार २५०, मोटेगाव- (७०५) ५५ लाख ९८ हजार २५०, मोरवड- (१५०) ९ लाख ९३ हजार २५० असे एकूण ४ कोटी ५० लाखांचे अनुदान वाटप करण्यात आले. तिसर्‍या टप्प्यातील मदतीचे शेतकर्‍यांना वाटप... निवाडा (५०९) २१ लाख २० हजार, मुरढव (३७३) २० लाख ६ हजार, मुसळेवाडी (३६९) २२ लाख ४९ हजार, नागापूर (१३४) ८ लाख २८ हजार ७५०, नरवटवाडी (१३२) ८ लाख १४ हजार २५०, निवाडा (३८१) १४ लाख २६ हजार ५००, पळशी (२७६) १५ लाख १२५०, पानगाव (१५०८) १ कोटी २१ लाख १० हजार, पाथरवाडी (५८६) ३ लाख २५ हजार ७५०, पोहरेगाव (८३६) २६ लाख ५५ हजार, रामवाडी (पा.) (६) ३४ हजार ५००, रेणापूर सज्जा-१ (१४८२) ६८ लाख २० हजार ३५०, रेणापूर सज्जा-२ (१०२६) ६८ लाख ५१ हजार, समसापूर (५४८) ३७ लाख ७३ हजार ७५०, सांगवी (३४७) ११ लाख ८८ हजार २५०, सय्यदपूर (२०३) १६ लाख ७३ हजार ५००, सेलू (२५६) ११ लाख ३१ हजार २५०, शेरा (५२१) ३१ लाख ५३ हजार ५००, सिंधगाव (६३५) २८ लाख ८० हजार ५००, सुकणी (२) १७ हजार ५००, सुमठाणा (३१२) १६ लाख ७९ हजार ७५०, टाकळगाव (४५०) २२ लाख ६८ हजार २५०, तळणी (६८२) ३६ लाख २० हजार ७५०, तत्तापूर (२२८) १० लाख २६ हजार, वाला- (४६६) २५ लाख ३६ हजार ७००, वांगदरी (४२६) ३३ लाख ३५ हजार ९५० अशा एकूण १२ हजार ६९४ शेतकर्‍यांचे ७ कोटी ७ लाख २८ हजार रुपयांचे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाले असून, त्याचे लवकरच वाटप होणार असल्याची माहिती तहसीलदार संजय वारकड यांनी दिली.