लोकमत आॅनलाईनचिपळूण (जि. रत्नागिरी) , दि. २९ : कौटुंबिक कलहातून चिपळूणजवळील वालोपे-देवूळवाडी येथील २४ वर्षीय विवाहितेचा तिच्या सासूनेच सुरीने २५ ते ३0 वार करुन खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सासू रेणुका नामदेव करकाळे (वय ५0) हिला ताब्यात घेतले आहे.चिपळूणजवळील वालोपे-देवूळवाडी येथे करकाळे कुटूंबिय भाड्याने राहतात. मूळचे वाघझरी, ता. उदगीर, जि. लातूर येथील या कुटूंबातील परी प्रशांत कारकाळे (वय २४) हिचे सासूसोबत पटत नव्हते. कौटुंबिक कलहातून शनिवारी सकाळी ९.३0 वाजता सासूने घरातील सूरीने सुनेच्या छातीवर २५ ते ३0 वार करुन तिचा खून केला. परीला साडेचार आणि दीड वर्षाची दोन मुले आहेत. तिचे माहेर करडखेडवाडी, ता. देगळूर, जि. नांदेड येथील असून रामराव शिंदे यांची ती कन्या होती.सासरा नामदेव कारकाळे हे शुक्रवार दुपारपासून बेपत्ता होता. तो शृंगारतळी येथे असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्यांना चिपळूण येथे आणले. याप्रकरणी सासू रेणुका हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलिस करत आहेत.
सुनेच्या छातीवर सूरीने केले ३0 वार
By admin | Published: April 29, 2017 3:02 PM