गंगापूर येथे ऊर्जा संवर्धन कार्यक्रम
लातूर : तालुक्यातील गंगापूर येेथे ऊर्जा संवर्धन कार्यक्रम पार पडला. यावेळी केदार खमितकर यांनी ऊर्जा बचतीबाबत मार्गदर्शन केेले. या कार्यक्रमाचे महात्मा फुले सामाजिक विकास मंडळ आणि वसुंधरा शेतकरी बचत गटाच्या वतीने आयोजन केले होते. कार्यक्रमास गावातील नागरिकांची उपस्थिती होती.
विजेचा लंपडाव
लातूर : शहरापासून नजीक असलेल्या हरंगूळ नवीन वसाहतीत विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महावितरणकडे तक्रार करण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. महावितरणने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
नियोजन कोलमडले
लातूर : शहरातील खाडगाव परिसरात घंटागाडीचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याकडे महापालिकेच्या स्वच्छता विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
श्रमिक कामगार संघटनेचे रक्तदान शिबीर
लातूर : महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी एम. एम. जमादार, जी. आर. पोतदार, प्रकाश घादगिने, अमोल जमादार, गोविंद सोंदले, संजय सुरवसे, भीमभाऊ कोळी, तानाजी बदले, आनंद निळे, संतोष तिवारी, विनोद थोरात, दत्ता बनसोडे, विक्रम मोहिते, धर्मराज रेड्डी, गोविंद कांबळे, आकाश काेळी, दत्ता जाधव, सुरज सुरवसे, प्रसाद कोळी, शुभम जाधव, महादेव झुंजे पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी संघटनेच्या वतीने ज्येष्ठ सदस्यांचा सत्कार करण्यात आला.