विभागीय अध्यक्षपदी विक्रम पाटील...
शिक्षक संघाच्या विभागीय अध्यक्षपदी उस्मानाबाद येथील विक्रम पाटील यांची निवड करण्यात आल्याची घोषणा माधवराव पाटील यांनी केली. राज्याध्यक्ष वरुटे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांबाबत शालेय शिक्षणमंत्री, ग्रामविकासमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल, असे सांगितले. राज्य सल्लागार बाळासाहेब काळे म्हणाले, दिवंगत शिवाजीराव पाटील यांनी अतिशय कष्टाने संघटना उभारली. त्याच जोमाने पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पती, पत्नी एकत्रीकरणाची अट १० किमी करा...
राज्य कार्याध्यक्ष लायक पटेल म्हणाले, पती, पत्नी एकत्रीकरणाची अट १० किमी करण्यात यावी, तालुक्याबाहेर गेलेल्या शिक्षकांना तालुक्यातच बदली द्यावी, एमएस-सीआयटीची अट रद्द करावी, शिक्षकांतून पदोन्नतीतून केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी भरण्यात यावेत, आंतरजिल्हा बदलीत पारदर्शकता यावी.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महादेव खिचडे, मोहन हाके, प्रल्हाद इगे, भरत साळुंखे, बाबूराव बनसोडे, वजीर बागवान, नितीन येलगटे, नसिरोद्दीन शेख, जावेद शेख, तालीब शेख, पठाण आदींनी परिश्रम घेतले.
२१लातूर
कॅप्शन : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या बैठकीत शिक्षक आ. विक्रम काळे यांनी मार्गदर्शन केले. मंचावर माधवराव पाटील, बाळासाहेब काळे, लायक पटेल, राजाराम वरुटे, मधुकर काठोळे, केशव जाधव.