पर्यावरणाचा समतोल राखुया...वृक्षांचे संवर्धन करुया, असे संदेश देणारे फलक विद्यार्थ्यांच्या हाती होते. निसर्गाप्रती संवेदनशीलता निर्माण व्हावी, आपण एक पर्यावरणासाठी जागरुक, संवेदनशील बनावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या दिंडीत सह्याद्री देवराई, लातूर वृक्ष, मराठा सेवा संघ, शाहू महाविद्यालय, केशवराज विद्यालय, वृक्ष प्रतिष्ठान, वसुंधरा प्रतिष्ठान, ग्रीन फाऊंडेशन, ट्री फाउंडेशन, ज्येष्ठ नागरिक संघ आदींनी सहभाग नोंदविला. यावेळी सुपर्ण जगताप, प्रा. सुनील नावाडे, जितेश चापसी, नगरसेविका रागिणी यादव, डॉ. बी. आर. पाटील, ॲड. सचिन काळे, मुख्याध्यापक संजय विभूते, महेश कस्तुरे, प्रशांत दुधमांडे, प्रतिभाताई गोमसाळे, डॉ. अभय कदम, प्रा. विजय गवळी, प्रा. सोमदेव शिंदे, आम्रपाली सुरवसे, धीरज तिवारी, अनिता देशपांडे, पृथ्वीराज पवार, विवेक सौताडेकर, डॉ. नेताजी शिंगटे, हेमंत रामढवे, सोमनाथ सुरवसे, खंडेराव गंगणे, अमर साळुंके, अमरदीप गुंजोटे, विष्णू चव्हाण, चंद्रकांत शिंदे, राणा चव्हाण, प्रसाद पाटील, वसुंधरा गर्जे, दिगंबर वेदपाठक, बालाजी चामे, महेश सुरवसे, सौरव गुरव आदींसह विद्यार्थ्यांची उपस्थिती हाेती.
पर्यावरण संवर्धनासाठी लातुरात वृक्षदिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 4:11 AM