शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

औसा-तुळजापूर महामार्गावर ट्रक-कारचा अपघात; एक जखमी

By राजकुमार जोंधळे | Published: October 17, 2023 5:25 AM

कारचा झाला चेंदामेंदा : साेमवारी रात्री उशिराची घटना...

औसा (जि. लातूर) : औसा येथून तुळजापूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रक आणि कारचा आझाद महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलावर अपघात झाला असून, कारचा समाेरील भाग चेंदामेंदा झाला. यामध्ये कारचालकाच्या उजव्या हाताला, डाेक्याला मार लागला आहे. औसा-तुळजापूर महामार्गावरून अनेक भाविक तुळजापूरला पायी दर्शनाला जात असून, सुदैवाने अनर्थ टळला आहे.

औसा येथील तुळजापूर महामार्गावरील आझाद महाविद्यालयासमोर असलेल्या उड्डाणपुलावरून ट्रक (एम.एच. २६ बी.ई. २३३१) तुळजापूरकडे जात होता, तर कार (एम.एच. ४६ ए.यू. ९४३२) जाताना रात्री उशिरा दोन्ही वाहनांचा अपघात झाला. यामध्ये कारचालक रोहन झुंबर सोलांने (वय २२) हा जखमी झाला आहे. जखमी चालकाला उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले. दरम्यान, औसा पाेलिसांनी घटनास्थळी दाखल हाेत वाहतूक सुरळीत केली. याबाबत औसा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.

भाविकांसाठी पाेलिस बंदोबस्त...नवरात्र महोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी भाविक तुळजापूरला पायी जातात. वाहनधारकांसह इतरांकडून त्रास हाेणार नाही, यासाठी बुधोडा, औसा, तुळजापूर मोड, शिवली मोडपर्यंत पाेलिस बंदोबस्त तैनात केला आहे. अधिकाऱ्यासह २० पोलिस कर्मचारी गस्तीवर आहेत, असे पोनि. सुनील रेजितवाड म्हणाले.

टॅग्स :Accidentअपघात