शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मांजरात पुरेसा पाणीसाठा नसल्याने यंदा वीस हजार हेक्टरला फटका

By हणमंत गायकवाड | Published: January 01, 2024 6:18 PM

उजव्या कालव्या अंतर्गत साडेसात तर डाव्याअंतर्गत साडेदहा हजार हेक्टर क्षेत्र कोरडे

लातूर: ‘मांजरात’ यंदाच्या पावसाळ्यात पुरेसा साठा झाला नसल्यामुळे प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे. त्यामुळे डाव्या व उजव्या कालव्या अंतर्गत सिंचन क्षेत्र कोरडे राहणार आहे. परिणामी, या पाण्यावर अवलंबून असलेला ऊस शेतकऱ्यांना यंदा मोडावा लागणार आहे. उजव्या कालव्याअंतर्गत ७ हजार ६६५ आणि डाव्या कालव्या अंतर्गत १० हजार ५५९ हेक्टर क्षेत्र बिगर ओलीताखाली राहणार आहे.

मांजरा प्रकल्पांतर्गत केज, कळंब, अंबाजोगाई, लातूर या चार तालुक्यातील क्षेत्र ओलिताखाली आहे. डावा कालवा ९० किमी अंतराचा असून सिंचन क्षेत्र १० हजार ५५९ हेक्टर आहे. तर उजवा कालवा ७६ किमी अंतराचा असून या कालव्या अंतर्गत ७ हजार ७६५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. दोन्ही काव्याअंतर्गत १८ हजार २२३ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. मात्र यंदा धरणात पाणी नसल्यामुळे रब्बी हंगाम व  पाण्यावर घेण्याची अन्य पिके घेता येणार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. जे पाणी धरणात आहे. ते पिण्यासाठी आरक्षित केले आहे. त्यामुळे यंदा शेतीला पाणी मिळणार नाही. पिण्यासाठीच पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे.

कालव्या अंतर्गत ६० टक्के उसाचे पीक....मांजरा प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्या अंतर्गत १८ हजार २२३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. या क्षेत्रावर बहुतांश ऊस आहे. जवळपास ६० टक्के क्षेत्र उसाचेच आहे. येथील काही ऊस आता तोडणीवर आहे. तर काहींची तोडणी झालेली आहे. परंतु पाणी नसल्यामुळे आता शेतकऱ्यांना हा ऊस मोडावा लागणार आहे. केवळ आणि केवळ कालव्याच्या पाण्यावर आहे असे क्षेत्र साठ टक्के आहे. त्यामुळे या क्षेत्रावरील ऊस यंदा मोडण्याशिवाय पर्याय शेतकऱ्यांकडे दुसरा नाही.

लातूर मनपाकडून पाणी वापरात काटकसरमांजरा प्रकल्पात सध्या २० टक्के जिवंत पाणीसाठा आहे. जिवंत पाणीसाठा पिण्यासाठा जून अखेर पुरू  शकतो. तरीपण लातूर महानगरपालिकेने पाणी वापराच्या अनुषंगाने काटकसर सुरू केली आहे. चार ते पाच दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता सात दिवसाआड केला आहे. दोन दिवस पुढे वाढविलेला आहे. यामुळे दररोज पाण्याची बचत होत आहे. पुढील चार महिन्यांमध्ये ०.४० एमएम क्यूब पाण्याची बचत होणार असल्याची माहिती लातूर महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी