शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

हिरोईन करतो म्हणून दोन मुलींचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2017 3:47 AM

चित्रपटात अभिनेत्रीचे काम देतो म्हणून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करणाऱ्या तथाकथित चित्रपट निर्माता-दिग्दर्शक असलेल्या विजय व राहुल खडके या दोघा बंधूना पोलिसांनी गजाआड केले

लातूर : चित्रपटात अभिनेत्रीचे काम देतो म्हणून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करणाऱ्या तथाकथित चित्रपट निर्माता-दिग्दर्शक असलेल्या विजय व राहुल खडके या दोघा बंधूना पोलिसांनी गजाआड केले असून मुलींची सुखरुप सुटका केली आहे.लातूर शहरातील दोन अल्पवयीन मुलींना चित्रपटात अभिनेत्रीचे काम देण्याचे आमिष रेणापूर तालुक्यातील मोहगाव (तळणी) येथील विजय व राहुल या सख्ख्या भावांनी दाखविले. परळी येथे या मुलींना नेऊन काही दिवस चित्रीकरणही केले. रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास खडके बंधूंनी दोन्ही मुलींना कॉफी पिण्याच्या निमित्ताने मोहगाव येथे नेले. मुली घरी आल्या नसल्याने आई-वडिलांनी चौकशी केली असता त्या खडके बंधूंसोबत असल्याचे समजले. पालकांनी भ्रमणध्वनीवरून मुलींशी संपर्क साधला असता त्यांना पळवून नेल्याचे समजले. त्यामुळे पालकांनी थेट एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी मोहगाव (तळणी) गाठून मुलींना व खडके बंधूंना सोमवारी पहाटे लातुरात आणले. खडके बंधूंविरुद्ध कलम ३६३, ३६६ (अ) ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अपहरणातील दोन्ही मुली या मैत्रिणी आहेत. त्या दोघींनाही खडके बंधूंनी चित्रपटात अभिनेत्री करण्याचे आमिष दाखविले. काही दिवस परळी येथे तथाकथित चित्रपटाचे चित्रीकरणही करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणात हे दोन बंधूच आहेत की आणखी काही साखळी आहे, याबाबत तपास सुरू असल्याचे तपास अधिकारी पवन यादव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. रेणापूर तालुक्यातील मोहगाव येथील रहिवासी असलेले विजय व राहुल खडके हे दोघे भाऊ आपण चित्रपट निर्माते असल्याचे भासवत दोन-तीन महिन्यांपासून फिर्यादीच्या घरी भाडेकरू म्हणून राहत होते, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. अद्याप त्यांनी घरभाडेही दिलेले नाही.