शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
2
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
3
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
4
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
5
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
6
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
7
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
8
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
9
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
10
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
11
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
12
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
13
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
14
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
15
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
16
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
17
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
18
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
19
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
20
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!

पावसाळ्यातील दोन महिने उलटले; लातूर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा!

By हरी मोकाशे | Published: August 09, 2023 6:49 PM

मोठ्या पावसाची प्रतीक्षा :लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ३१८ मिमी नोंद

लातूर : पावसाळ्यातील दोन महिने उलटले असले तरी जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे नदी-नाले अद्यापही वाहिले नाहीत. परिणामी, जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा झाला आहे. प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, जवळपास आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने पिकांतील आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३१८.४ मिमी पाऊस झाला आहे.

यंदा मृग नक्षत्र कोरडा गेल्याने शेतकऱ्यांची धास्ती वाढली होती. आर्द्रा नक्षत्रात अल्प प्रमाणात पावसाने बरसात केली. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना प्रारंभ झाला. मात्र, तो सर्वत्र नव्हता. त्यानंतर पुनर्वसू नक्षत्रात सतत पाऊस झाल्यामुळे खरीप पेरण्यांना वेग आला. दरम्यान, पुष्य नक्षत्राच्या अखेरीपर्यंत जिल्ह्यात पेरण्या सुरूच होत्या. जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ९७ टक्के पेरण्या झाल्या आहेत.यंदा पावसाने उशिरा सुरुवात केल्याने विलंबाने पेरण्या झाल्या. सध्या खरिपातील पिके बहरत आहेत. लवकर पेरणी केलेल्या क्षेत्रावरील सोयाबीनला फुले लागण्यास सुरुवात झाली आहे. सततच्या अल्प पावसामुळे शेतातील पिकांमध्ये तण वाढले आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी तणनाशकांची फवारणी करीत आहेत. आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने आंतरमशागतीच्या कामास वेग आला आहे.

पावसाळ्यातील दोन महिने उलटले तरी अद्यापही सातत्याने दमदार पाऊस नाही. त्यामुळे नदी-नाले वाहिले नाहीत. तसेच जलसाठ्यात वाढ झाली नाही. त्यामुळे प्रकल्पातील जलसाठ्यात अपेक्षित वाढ झाली नाही. प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

मागील वर्षी ९७ दलघमी जलसाठा...गेल्या वर्षी याच कालावधीत जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात एकूण ९७.८९१ दलघमी जलसाठा होता. आता २५.१५१ दलघमी एवढा पाणीसाठा आहे. तसेच जिल्ह्यातील १३४ लघु प्रकल्पात ६४.८६३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याची २०.६४ अशी टक्केवारी आहे.

साकोळ प्रकल्पात ४३ टक्के जलसाठा...मध्यम प्रकल्प - उपयुक्त पाणीसाठा - टक्केवारीतावरजा - ०.८६२ - ४.२४व्हटी - जोत्याखाली - ००रेणा - ५.२१८ - २५.३९तिरू - जोत्याखाली - ००देवर्जन - ४.२१९ - ३९.५०साकोळ - ४.७१० - ४३.०२घरणी - ६.१२७ - २७.२७मसलगा - ४.०१५ - २९.५२एकूण - २५.१५१ - २०.५९

ऑगस्टच्या आठवडाभरात ५.७ मिमी पाऊस...तालुका - आठवडाभरात - आतापर्यंतलातूर - ३.९ - ३०२.१औसा - १०.९ - २५०.८अहमदपूर - ४.९ - २९५.१निलंगा - ९.४ - ३०६.४उदगीर - २.७ - ४३०.२चाकूर - १.१ - २६८.४रेणापूर - १.२ - २५२.५देवणी - १०.३ - ४९१.६शिरूर अनं.- ९.० - ३४८.७जळकोट - १.३ - ३६८.३एकूण - ५.७ - ३१८.४

टॅग्स :laturलातूरRainपाऊसFarmerशेतकरी