लातूर : जिल्ह्यात शनिवारी ३४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यातील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एकाचा अहवाल प्रलंबित आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या १४७ वर पोहोचली आहे. लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील १५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर देवणी येथील एका व्यक्तीचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. लातूरच्या स्त्री रूग्णालयातून १७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी १५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, सदरील रूग्ण हा लातूर शहरातील भाग्य नगर भागातील आहे़ तर एकाचा अहवाल प्रलंबित आहे.
तसेच उदगीर उपजिल्हा रूग्णालयातून आलेल्या एका व्यक्तीच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तो व्यक्ती आझाद नगर येथील आहे़ त्याला मुंबई प्रवासाचा इतिहास आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर व विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
दरम्यान आतापर्यंत १११ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यातील ११ जणांना शनिवारी सायंकाळी सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आता ३२ जणांवर उपचार सुरु आहेत. होम क्वारंटाईनमध्ये १ हजार १४ तर संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये १ हजार १८ व्यक्ती आहेत.