राजकुमार जाेंधळे, उदगीर (जि. लातूर) : एका प्राध्यापकाचे अपहरण करून ८ लाख १४ हजाराला लुबाडल्याची घटना घडली होती. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. यातील दाेघा संशयित आराेपींना उदगीर पाेलिसांनी अटक केली आहे. तर प्रमुख आराेपीसह अन्य एक अद्यापही पाेलिसांच्या हाती लागला नाही.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी प्रा. सदाविजय विश्वनाथे यांना गाडीत डांबून लातूरच्या दिशेने नेल्यानंतर लातूर मल्टिस्टेट बँक व सिंडिकेट बँकेतून फिर्यादीच्या खात्यातून अरोपीच्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने ट्रान्सफर करून घेतली हाेती. याबाबत उदगीर ग्रामीण ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल केला. दरम्यान, तीन पाेलिस पथकांनी आराेपींचा शाेध सुरू केला. गुरुवारी दाेन बँकांतील सीसीटीव्ही फुटेजची पाेलिसांनी दिवसभर पाहणी केली. यातील तिघे संशयित आराेपी निष्पन्न झाले. चार आरोपींपैकी बालाजी शिवाजी कांबळे (२८), हणमंत व्यंकट गुंडरे (३०, दाेघेही रा. नागलगाव, ता. उदगीर) या दाेघा संशयितांना शुक्रवारी उदगीर ग्रामीण पोलिसांनी अटक केली. यातील प्रमुख्य आरोपींसह दुसरा संशयित फरार आहे. या दोन्ही आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
दाेन बँकांमधील सीसीटीव्हीत कैद...उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केेल्यानंतर तातडीने तीन पाेलिस पथकांची निर्मिती करण्यात आली. गुरुवारी पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या पथकाने लातुरातील दोन बँकांमधील सीसीटीव्हीच्या फुटेजची पाहणी केली आणि आरोपी निष्पन्न झाले. शुक्रवारी चारपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. - पाे. नि. अरविंद पवार, उदगीर