लातूर : शहरातील विशालनगर येथे काशी विश्वेश्वर मंदिरातील दानपेटी फाेडून राेकड लंपास केल्याची घटना घडली हाेती. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दाेन दुचाकी, दानपेटीसह दाेघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. हा गुन्हा तिघांनी केल्याची कबुली अटकेतील दाेघांनी दिली आहे.
लातुरातील चाेरीसह इतर गुन्ह्यातील आराेपींचा शाेध घेण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले हाेते. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. गजानन भातलवंडे यांच्या पथकाने दुचाकी चोरी, घरफाेडीच्या गुन्ह्यांतील आराेपींचा शाेध सुरू केला हाेता. त्याबाबतची माहिती मिळवत असताना २२ जानेवारी रोजी माहिती मिळाली. शिवाजीनगर ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दुचाकी घेऊन संशयित हा जिल्हाधिकारी कार्यालय पाठीमागील परिसरात फिरत आहे, अशी माहिती खबऱ्याने दिली.
..अन् त्याने गुन्ह्याची दिली कबुलीखबऱ्याच्या माहितीवरून पथकाने तातडीने घटनास्थळी पाेहोचत एकाला ताब्यात घेतले. त्याची अधिक विचारपूस केली असता, त्याने गणेश श्रीकांत साळुंखे (वय २२, रा. कैलासनगर, लातूर) असे नाव सांगितले. तसेच ताब्यातील वाहन, लोखंडी दानपेटीची चाैकशी केली असता, काही दिवसांपूर्वी लातूर पंचायत समितीच्या पाठीमागून चोरी केली आहे, तर दानपेटी दोन दिवसांपूर्वी विशालनगर येथील काशी विश्वेश्वर मंदिरातील फाेडली आहे. हा गुन्हा तिघांनी मिळून केल्याची कबुली दिली. तसेच मोतीलाल उर्फ कुक्या बादल शिंदे (वय २२, रा. मोहा, ता. कळंब जि. उस्मानाबाद) यालाही अटक करण्यात आली आहे. याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
एका चाेरट्याचा पथकाकडून शाेध...पथकाने दाेन दुचाकी, दानपेटी, मोबाइल असा १ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थागुशाचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, अमलदार राजेंद्र टेकाळे, प्रकाश भोसले, नवनाथ हाजबे, तुराब पठाण, योगेश गायकवाड, रामहारी भोसले, मोहन सुरवसे, प्रदीप चोपणे यांच्या पथकाने केली आहे. आता पाेलिसांकडून इतर दाेघांचा शाेध घेतला जात आहे.