लातूर : ऑटाेवर बनावट नंबरप्लेटचा वापर करुन फसवणूक केल्याची घटना लातूर शहरात घडली. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात ऑटाेचालकाविराेधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरात एक चालक (एम.एच. २४ ए.टी. २२०९) हा नंबर प्लेट टाकून शहरात फिरत असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पाेलिस निरीक्षक गणेश कदम यांना मिळाली. या माहितीच्या आधारे ताे ऑटाे ताब्यात घेवून, चालक ऑटाे चालक हरी श्रीरंग माळी (वय ५१ रा. स्वराज नगर, पाखरसांगवी ता. लातूर) याला ताब्यात घेत चाैकशी केली. ऑटाेच्या पुढील बाजूस, डाव्या बाजूला ऑटाे (एम.एच. २४ ए.टी. २२०९) असा क्रमांक लिहिलेला आणि पाठीमागील बाजूस ऑटाे (एम.एच. २४ ए.टी. २०९) आणि उजव्या बाजूस ऑटाे (एम.एच. २४ ए.टी. २२०) असा क्रमांक लिहिल्याचे आढळून आले. त्याच्याकडील कागदपत्रांची पडताळणी केली. ताब्यातील चालकाने ई-चलान दंड पडला तरी मूळ ऑटाे (एम.एच. २४ ए.टी. २२०९) वर पडेल. या हेतूने क्रमांक टाकला असल्याचे सांगितले. या माध्यमातून त्यांनी शासनाची आणि ऑटाेमालकाची (एम.एच. २४ ए.टी. २२०९) फसवणूक केली. ऑटाेवर पुढील बाजूस, डाव्या बाजूस (एम.एच. २४ ए.टी. २२०) लिहून फसवणूक केली. मूळ ऑटाे (एम.एच. १२ क्यू.आर. ५३८५) यांचे परमीट पुणे जिल्हा येथील असताना लातुरात ऑटाे चालवून शासनाची फसवणूक केली. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन ऑटाे चालक हरी श्रीरंग माळी याच्याविराेधात गुरनं. ४०५ / २०२३ कलम ४२० भादंविप्रमाणे, माेटार वाहन कायदा कलम ६६ (१) / १९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे, डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे पाेलिस निरीक्षक गणेश कदम, सहायक पाेलिस निरीक्षक प्रतिभा ठाकूर, पाेहेकाॅ. सुग्रीव नागरगाेजे, मद्देवाड, घाेगेर, चालक नागरगाेजे, पाेना. बिराजदार, पाेकाॅ. सय्यद यांच्या पथकाने केली.