शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

मुख्याध्यापक,केंद्रप्रमुखांची रिक्त पदे पदोन्नतीने भरावीत; प्राथमिक शिक्षक समितीचे धरणे

By संदीप शिंदे | Published: August 08, 2022 4:36 PM

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही.

लातूर : जिल्ह्यातील शाळांमध्ये मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, प्राथमिक पदवीधर यांची रिक्त पदे पदोन्नतीने भरावीत, पदोन्नती दिल्यानंतर एक वेतनवाढ द्यावी यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सोमवारी दुपारी ३ वाजेपासून जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे चटोपाध्याय व निवडश्रेणीचे आदेश काढावेत, शिक्षकांच्या मुळ सेवापुस्तिकेची पडताळणी तालुकानिहाय कॅम्प लावून करावी, गोपनीय अहवालाची प्रत शिक्षकांना देण्यात यावी, २०२१-२२ च्या सर्व शाळांना ४ टक्के सादील व शाळा अनुदान वितरीत करावे, शालेय पोषण आहाराचे मार्च ते जुलै २०२२ मधील इंधन, भाजीपाला, मतदनीसांचे मानधन देण्यात यावे, २०१५ पासून पोषण आहाराचा अहवाल सादर करण्याचा निर्णय रद्द करावा, १०० टक्के विद्यार्थ्यांना गणवेश वितरीत करावे यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे शिवाजीराव साखरे, माधवराव फावडे, कुलदीप पाटील, किशनराव बिरादार, संजय सुर्यवंशी, विकास पुरी, रंजना चव्हाण, अरुण सोळूंके, बालाजी येळीकर, रणजीत चौधरी, नजीर मुजावर, चंद्रकांत भोजने आदींसह शिक्षकांचा सहभाग होता.

सेवेत कायम केल्याचे आदेश काढावेत...जिल्हा परिषदेतील पात्र शिक्षकांना सेवेत कायम केल्याचे आदेश काढावेत, एकाच तारखेस सेवेतरुजु झालेले सहशिक्षक व प्राथमिक पदवीधर यांच्या वेतनात शिक्षकाच्या वेतनापेक्षा तफावत असून, ती दुर करावी, एससी, एसटी, ओबीसी, मागासवर्गीय कर्मचारी व अधिकाऱ्यांचा अनुषेश भरुन काढावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

टॅग्स :laturलातूरEducationशिक्षणTeacherशिक्षक