शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
2
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
3
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
4
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
5
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
6
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
7
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
8
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
9
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
10
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
11
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
12
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
13
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
14
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
15
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
16
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
17
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
18
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
19
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
20
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान

३१ मे पर्यंत विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करा; अन्यथा शिक्षकांचे वेतन नाही होणार!

By संदीप शिंदे | Published: May 27, 2023 5:43 PM

वारंवार मुदतवाढ देऊनही शाळांचा कानाडोळा

लातूर : शाळांतील बोगस पटसंख्येला आळा घालण्यासाठी व शासनाच्या विविध योजना प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आधार प्रमाणीकरण करण्यात येत आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही जिल्ह्यात अजूनही ६३ हजार २६८ विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडले आहे. यासाठी ३१ मे ची डेडलाईन देण्यात आली असून, या कालावधीत विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण न करणाऱ्या शाळांमधील शिक्षकांचे वेतन रोखण्यात येणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी मागील वर्षीपासून शिक्षण विभागाच्या शाळांना सुचना आहेत. यासाठी वेळोवेळी प्रशिक्षणही देण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात एकूण २ हजार ६९६ शाळांमध्ये ५ लाख १३ हजार ८१३ विद्यार्थी आहेत. आतापर्यंत यातील ४ लाख ५० हजार ५४५ विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. याची टक्केवारी ८७.६९ टक्के असून, अद्याप ६३ हजार २६८ विद्यार्थ्यांचे अर्थात १४.०४ टक्के आधार प्रमाणीकरण रखडले आहे. या विद्यार्थ्यांचे प्रमाणीकरण ३१ मे पर्यंत पुर्ण करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. दिलेल्या मुदतीत प्रमाणीकरण न केल्यास पुढील वेतन स्थगित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

आधार प्रमाणीकरणासाठी शिबिर...वारंवार लेखी व तोंडी सुचना देऊनही अनुदानित व स्वंयअर्थसहायित शाळांच्या मुख्यध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम केलेले नाही. अशा सर्व मुख्याध्यापकांना २९ मे रोजी सकाळी १० वाजता बार्शी रोडवरील नेटीझन्स स्कूल येथे उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी मुख्याध्यापक, लिपिकांना लॅपटॉप, आधार कार्ड व इतर आवश्यक त्या माहितीसह उपस्थित रहावे लागणार आहे. शिबिरात अडचणीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी सांगितले.

६३ हजार विद्यार्थ्यांचे प्रमाणीकरण रखडले...अहमदपूर तालुक्यातील ५१३०, औसा ३८८६, चाकूर ३८०९, देवणी २०५९, जळकोट ३१५७, लातूर ८०९८, लातूर युआरसी १- ८०६५, लातूर युआरसी २-१२८९०, निलंगा ५८९७, रेणापूर २१३६, शिरुर अनंतपाळ ६५३ तर उदगीर तालुक्यातील ७ हजार ४८८ अशा एकूण ६३ हजार २६८ विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप रखडलेले आहे. शाळांना वेळोवेळी सुचना देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे ३१ मे ची डेडलाईन जवळ आली असताना शिक्षण विभागाकडून शाळांना सक्तीच्या सुचना करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डlaturलातूरEducationशिक्षणStudentविद्यार्थीSchoolशाळा