लातूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात ४९.४१ टक्के जिवंत पाणीसाठा झाला असून, गेेल्या २४ तासांमध्ये ०.८२३ दलघमी पाणीसाठ्याची वाढ झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात ४०.१४२ दलघमी नवीन पाणीसाठा झाला आहे.
धरणक्षेत्रात आतापर्यंत ५०१ मिमी. पाउस झाला असून, गेल्या २४ तासामध्ये २ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. त्यात ०.८२३ दलघमी पाणी आले आहे. अशी माहिती शाखा अधिकारी सुरज निकम यांनी दिली. सध्यस्थितीत धरणात ८७.४२९ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. तर धरणाची जिवंत पाणीसाठ्याची क्षमता १७६.९६३ दलघमी आहे.
मोठ्या पावसाची प्रतिक्षा...पावसाळा शेवटच्या टप्प्यात आला तरी, धरणातील पाणी पातळीने ५० टक्क्यांची पातळी ओलांडली नाही. यासाठी धरण क्षेत्रात आता मोठया पावसाची प्रतीक्षा आहे. धरणक्षेत्र सोडून इतर परिसरात मोठया पावसाने हजेरी लावली. परिणामी, लातूर जिल्ह्यातील आठपैकी चार प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. तर अन्य चार प्रकल्प अद्यापही भरले नाही.