शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळालाही उद्याच शपथ द्यायची की नाही, संध्याकाळी हायकमांड ठरविणार; रुपानींचे संकेत...
2
Devendra Fadnavis: "चार गोष्टी मनासारख्या होतील, चार विरुद्ध होतील"; फडणवीसांचा इच्छुकांना मेसेज
3
ते पुन्हा आले! २०१९ चा 'घात' ते २०२४ ची 'लाट'; देवेंद्र फडणवीसांसाठी कसा होता ५ वर्षांचा प्रवास?
4
देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याची पत्रिका व्हायरल; बघा, त्यांच्यासोबत कोण-कोण घेणार शपथ?
5
'त्या' संघर्षातही आमदारांनी साथ सोडली नाही, आज इतिहास घडला - देवेंद्र फडणवीस
6
७५ वर्षांचे असूनही फिट अँड फाइन कसे? नाना पाटेकर म्हणतात- "जीममध्ये जाता येत नसेल तर..."
7
रेल्वे प्रवाशांना प्रत्येक तिकिटावर किती सबसिडी मिळते? अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितलं...
8
महागाईत ग्राहकांना बसणार आणखी एक चटका! Swiggy वरून ऑर्डर करणे महागणार, 'हे' शुल्क वाढणार
9
'शिवेंद्रराजेंना मंत्री करा' म्हणत टॉवरवर आंदोलन; होमगार्डने पोलीस प्रशासनाला वेठीस धरले
10
Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री...अशी आहे देवेंद्र फडणवीस यांची झंझावाती राजकीय कारकीर्द!
11
साराचा नवा प्रवास! गोरगरिब लेकरांसाठी काम करत तेंडुलकर घराण्याची परंपरा जपण्याचा 'ध्यास'
12
डिफेन्स स्टॉक्सची मोठी झेप; ₹२१७७२ कोटींच्या अधिग्रहण प्रस्तांवाना मंजुरी; कोणते आहेत शेअर्स?
13
"आता मला लवकर लग्न करायचंय; ३ मुलांना जन्म द्यायचाय, जर दोन वर्षांत मुलगा..."
14
रशिया हल्ला करणार? युरोपमध्ये चाललीय तिसऱ्या विश्वयुद्धाची तयारी; जर्मन गुप्तचर संघटनेच्या दाव्याने खळबळ
15
मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार: ७ राशींवर धनलक्ष्मी कृपा, लॉटरीतून लाभ; अपार यश, भरभराटीचा काळ!
16
"दिल्लीत येण्याआधी खूप विचार करतो कारण..."; गडकरींची राजधानीपासून दूर राहण्याला पसंती
17
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड
18
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश; मनी ट्रेल, फंडिंगचे मिळाले पुरावे
19
महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक कारवर बंदी येणार? इंडिगो एअरलाईन्सने खेचलं कोर्टात; काय आहे प्रकरण?

इन्स्टाग्रामवर रिल्स पाहणे पडले महागात; महिलेने ओळख वाढवून तरुणाला १० लाखांस फसवले

By राजकुमार जोंधळे | Published: June 24, 2023 8:03 PM

प्रारंभी लाखाची गुंतवणूक करायला सांगितले. त्यावेळी दर आठवड्याला चांगले व्याज दिले

लातूर : इन्स्टाग्रामवर रिल्स, मराठी मालिकेला फाॅलाे करणे लातुरातील एका तरुणाला महागात पडले आहे. कल्याण (जि. ठाणे) येथील एका महिलेकडून अधिकच्या व्याजाचे आमिष दाखवत चक्क दहा लाखांनी गंडा घातल्याची घटना घडली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात शनिवारी महिलेविराेधात गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले की, इन्स्टाग्रामवर रिल्स, मराठी मालिकेला फाॅलाे, लाइक करत असताना तक्रारदार पंकज विनायक जाधव (वय २१, रा. शिंदखेड, ता. निलंगा, ह.मु. शारदानगर, लातूर) याची मुंबईच्या एका महिलेसाेबत ओळख झाली. इन्स्टाग्रामवर मराठी मालिका, रिल्स पाहिली. त्यातील एका बालकलाकाराचे त्याने काैतुक केले. फाॅलाे केले. यातून त्या कलाकाराच्या आईची ओळख झाली. पूजा निशांत भाेईर (रा. कल्याण, जि. ठाणे) असे महिलेचे नाव आहे. याच ओळखीतून तरुणाला आकर्षक व्याज देण्याचे तिने आमिष दाखविले. त्यासाठी एक स्कीमही सांगितली. कुठले तरी ॲप्लिकेशन डाउनलाेड करायला सांगितले. १५ जानेवारी ते १० जून २०२२ या काळात त्या महिलेने जाधवकडून तब्बल दहा लाख रुपये घेतले. गत काही दिवसांपासून त्या महिलेने व्याज दिले नाही. अधिक चाैकशी केली असता मुद्दलही दिले नाही. दरम्यान, काही दिवसांनंतर त्या महिलेने पैसे परत करण्यासाठी मुदत मागितली. त्या मुदतीतही पैसे परत केले नाहीत.

याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पूजा निशांत भाेईर (रा. कल्याण, जि. ठाणे) या महिलेविराेधात गुरनं. ४५२/ २०२३ कलम ४०६, ४२० भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पाेलिस उपनिरीक्षक आर. ए. लाेखंडे करत आहेत.

१३ आठवडे मिळाले व्याज...प्रारंभी लाखाची गुंतवणूक करायला सांगितले. त्या लाखावर दर आठवड्याला ७ हजार ७० रुपयांचे व्याज दिले गेले. दरम्यान, सलग १३ आठवड्यांनंतर एक लाख रुपये काढून घेण्यास सांगितले. मात्र, तरुणाने रक्कम काढून घेण्यास नकार दिला. त्यानंतर आता किमान दहा लाख रुपये ठेवावे लागतील, अशी अट घातली गेली. त्यानुसार तरुणाने दहा लाखांची जाेड करून गुंतवणूक केली. काही दिवसांनंतर व्याजही बंद झाले. अधिक चाैकशी केली असता फसवणूक झाल्याचे समाेर आले. - गाेरख दिवे, पाेलिस निरीक्षक, लातूर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर