जवळगा पो.दे. हे औसा शहरापासून १६ कि.मी. अंतरावर आहे. या भागातील हे मोठे गाव असून, येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद प्रशाला व खासगी शिक्षण संस्था आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक, ग्राम सचिवालय, आदी आहेत. जवळगा पोमादेवी येथील आठवडी बाजारामुळे गावातील शेतकऱ्यांसह नागरिकांची सोय होणार आहे. तसेच परिसरातील दापेगाव, जवळगा, जवळगावाडी, माळकोंडजी, संक्राळ, हरेगाव, तुंगी, मसलगा येथील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला ताजा भाजीपाला व फळांच्या विक्रीची आठवडी बाजारामुळे व्यवस्था होणार आहे. गुरुवारपासून हा बाजार सुरू करण्यात आला. त्यासाठी सरपंच अमोल पाटील, उपसरपंच सचिन माळी यांनी पुढाकार घेतला.
दरम्यान, व्यापाऱ्यांसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याचे पाणी व आवश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यावेळी कालिदास कांबळे, विष्णू काकडे, सचिन पाटील यांच्यासह परिसरातील शेकडो ग्रामस्थ व व्यापारी उपस्थित होते.