लातूर : रेणापूर पाेलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात फिर्यादीच्या बाजूने तपास करून, न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल करण्याच्या कामासाठी पाच हजारांची लाच स्वीकारताना एका महिला पाेलीस उपनिरीक्षकाला साेमवारी रेणापूर बसस्थानक परिसरात रंगेहाथ पकडले. याबाबत रेणापूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, रेणापूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या एका प्रकरणात ४८ वर्षीय तक्रारदाराकडे फिर्यादीच्या बाजूने तपास करून, न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दाेषाराेपपत्राच्या कामाचा माेबदला म्हणून महिला पाेलीस उपनिरीक्षक रेणुका जाधव यांनी सात हजारांची मागणी करण्यात आली. तडजाेडीअंती पाच हजारांची लाच स्वीकारण्याचे ठरले. दरम्यान, लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने याबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने रेणापूर बसस्थानक परिसरात साेमवारी सापळा रचला. दरम्यान, रेणापूर पाेलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पाेलीस उपनिरीक्षक रेणुका बालाजी जाधव (वय ३१) यांना पाच हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
याबाबत रेणापूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पाेलीस उपाधीक्षक पंडित रेजितवाड यांनी दिली. ही कारवाई पाेलीस निरीक्षक अन्वर मुजावर यांच्या पथकाने केली.
बसस्थानक परिसरात सापळा...तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने याबाबतची खातरजमा केली. त्यानंतर रेणापूर बसस्थानक परिसरात साेमवारी सापळा लावला. दरम्यान, सात हजारांची मागणी करून, तडजाेडीअंती तक्रारदाराकडून पाच हजार रुपये स्वीकारताना पाेलीस उपनिरीक्षकाला पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले.