शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
2
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
3
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
4
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
5
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
6
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
7
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
8
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
9
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
10
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
11
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
12
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
13
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
14
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
15
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
16
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
17
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
18
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
19
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
20
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....

गणेशोत्सवात आझादी का महोत्सवाचे देखावे करावेत; जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर 

By आशपाक पठाण | Published: July 27, 2023 7:34 PM

नूतन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी पदभार घेतल्यावर पत्रकारांशी संवाद साधला.

लातूर : आझादी का अमृत महोत्सव, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन विशेष पद्धतीने साजरा केला जाणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळातही मंडळांनी यावर देखावे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केले.

नूतन जिल्हाधिकारी ठाकूर यांनी पदभार घेतल्यावर पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, लातूर हे शैक्षणिक, ॲग्रीकल्चर हब आहे, ही आपल्या जिल्ह्याची ताकद आहे. जल व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. महिला सक्षमीकरणासाठी काम केले जाईल. जोपर्यंत मालकी हक्क, आर्थिक नियोजनात महिलांचा वाटा वाढत नाही तोपर्यंत त्या समक्ष होणार नाहीत, यासाठी प्रयत्न करू. यावेळी नूतन सीईओ अनमोल सागर म्हणाले, आझादी का अमृत महोत्सव, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यासाठी तयारी सुरू आहे. यानिमित्त आदर्श अमृत वाटिका तयार केली जाणार असून यात गावांचा सहभाग महत्त्वाचा आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी महाडीक, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सुचिता शिंदे यांची उपस्थिती होती.

जळकोटमध्ये अनुदान वाटपाची प्रक्रिया...जळकोट तालुक्यात अतिवृष्टीने अनेक शेतकरी, घरांचे मोठे नुकसान झाले. याठिकाणचा सर्व्हे करण्यात आला असून तिथे आता अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अतिवृष्टीत आपत्कालीन विभाग सक्षम केला जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.

बीएलओ रुजू न झाल्यास कारवाई...मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे २१ जुलै ते २१ ऑगस्टदरम्यान घरोघरी भेटी देणार आहेत. मतदान नोंदणी न झालेले पात्र नागरिक संभाव्य मतदार, मयत, कायमस्वरूपी स्थलांतरित व अस्पष्ट फोटो असणारे मतदार याचे सर्वेक्षण करणार आहेत. यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. गैरहजर असलेल्या १४ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. बीएलओंनी तात्काळ रुजू होऊन काम सुरू करावे. रुजू न झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी सांगितले.

महिला मतदारांची नोंद वाढायला हवी...महिलांचे मतदान नोंदणीत प्रमाण वाढले पाहिजे, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. माहेरवासीयांनी सासरी आल्यावर आवर्जून आपली मतदार नोंदणी करावी. नवीन मतदारांच्या नोंदणीचे प्रमाण वाढावे, यासाठी महाविद्यालयात मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी घरी येणाऱ्या बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी ठाकूर यांनी केले.

टॅग्स :laturलातूरIndependence Dayस्वातंत्र्य दिन