तपासण्या वाढल्या
कोरोना झाल्यानंतर किंवा लसीकरण केल्यानंतर ॲन्टिबॉडीज तपासणी करणाऱ्यांचे प्रमाण काही प्रमाणात वाढत आहे. कोविड झाल्यानंतर २८ दिवसांनंतर ॲन्टिबॉडीज तयार होतात. लसीकरणानंतरही त्या तयार होतात. ते पाहण्यासाठी तपासणी करण्याचे प्रमाण आहे.
तरुणांची संख्या जास्त
सध्या १८ ते ४४ आणि ४५ वर्षांपुढील वयोगटात लसीकरण करण्यात येत आहे. ज्यांनी लस घेतली आहे, अशा १८ ते ४४ वयोगटांतील काही हौशी तरुण ॲन्टिबॉडीजची तपासणी करून घेत असल्याला दुजोरा मिळाला आहे.
तपासणी करण्याची गरज आहे का?
कोरोना झाला असेल किंवा नसेल, ज्यांनी लस घेतली त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ॲन्टिबॉडीजची तपासणी करू नये. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून कोरोना नियमांचे अनुपालन करावे. विनाकारण खर्च करण्याची गरज नाही.
- डॉ. एल. एस. देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक
जिल्ह्यातील लसीकरण
पहिला डोस ५,२५,२१०
दुसरा डोस १,४६,९९६
एकूण लोकसंख्येच्या तुलनेत प्रमाण २८ टक्के