शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जळकोट तालुक्यात सर्वदूर पाऊस; एकाच दिवशी ४७ मि.मी. नोंद, चार गावांचा संपर्क तुटला

By संदीप शिंदे | Published: July 25, 2024 5:08 PM

जळकोट तालुक्यात नदी, नाले, कालवे ओसंडून वाहत असून, एकाच दिवशी जळकोट मंडळात ४७ तर घोणसी मंडळात ४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जळकोट : तालुक्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची हजेरी असून, शेतीपिकांना दिलासा मिळाला आहे. तर साठवण तलावातील मोठ्या प्रमाणात आवक सुरु झाली आहे. दरम्यान, गुरुवारी नदी नाल्यांना पूर आला असून, ढोरसांगवी- धनगरवाडी- ढोरसांगवी- जळकोटकडे जाणाऱ्या पुलावरुन काहीकाळ पाणी वाहिले. परिणामी, चार गावांचा संपर्क तुटला होता. पावसाचा ओघ कमी झाल्यावर वाहतूक पूर्वपदावर आली.

जळकोट तालुक्यात नदी, नाले, कालवे ओसंडून वाहत असून, एकाच दिवशी जळकोट मंडळात ४७ तर घोणसी मंडळात ४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत ४३२ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद तहसील प्रशासनाकडे आहे. बुधवारी सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला. तर गुरुवारी मध्यरात्री पावसाचा जोर वाढल्याने नदी, नाल्यांना पाणी आले आहे. तालुक्यातील सोनवळा करंजी, रावणकोळा, माळहिपरगा, ढोरसांगवी, गुत्ती क्रमांक एक, क्रमांक दोन, जंगमवाडी, हळद वाढवणा, अतनूर, गव्हाण, मरसांगवी आदी साठवण तलावात ७० टक्के जलसाठा झाला असून आणखीन मोठा पाऊस झाल्यास हे सर्व तलाव शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो होतील. परिणामी, भविष्यातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी याचा निश्चित फायदा होणार आहे. तालुक्यात जुलैअखेरपर्यंत पावसाने ५० टक्के सरासरी गाठली आहे. त्यामुळे पिकांना दिलासा मिळाला असून, पशूधनाच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

सूर्यदर्शन नसल्याने पिकांना धोका...जळकोट तालुक्यात खरीपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडला. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. जवळपास १५ ते २० दिवसानंतर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे साठवण तलावात येवा वाढला असला तरी तीन दिवसांपासून सुर्यदर्शन नसल्याने पिके पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तालुक्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा असून, त्यापाठोपाठ कापूस आणि तुरीचा पेरा आहे.

नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी...जळकोट तालुक्यात सर्वदूर पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. शेतीच्या उत्पादनावरच शेतकऱ्यांची मदार असून तालुका एक हंगामी खरिपाचा तालुका आहे. दरम्यान, पावसामुळे तालुक्यातील अनेक गावात पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. नुकसानग्रस्त भागाची तहसील प्रशासन, कृषी विभागाने पाहणी करून पंचनामे करावे व शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशीही मागणी करण्यात येत आहे.

पावसाळ्यात तिरू नदीवर पुलाचे काम...तालुक्यातील तिरू नदीवर अतनूरनजीक नवीन पुलाचे काम ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आले. त्यामुळे पर्यायी पूल उभारण्यात आला. मात्र, सोमवारी झालेल्या पावसामुळे पर्यायी पूल वाहून गेला असून, नवीन पूल उभारणीपर्यंत अतनूरसह विविध गावांचा रस्ता मार्गाने असलेला संपर्क खंडित राहणार आहे. ऐन पावसाळ्यात जुना पूल तोडून वाहतुकीचा खोळंबा केल्याबद्दल नागरिकांतून ठेकेदाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :laturलातूरRainपाऊसWaterपाणी