भादा पोलीस ठाण्याअंतर्गतच्या गावांत अवैध धंदे वाढले आहेत. त्यातच खुलेआमपणे अवैधरित्या दारूविक्री करण्यात येत आहे. त्यामुळे गावात तळिरामांची संख्या वाढली आहे. हे तळिराम रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना बोलून अपमानित करत असतात. त्यामुळे महिला, मुलींना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच गावांत तंट्यांचे प्रमाण वाढले आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे अवैध दारूविक्री बंद करण्यात यावी, अशी मागणी करत महिलांनी संताप व्यक्त केला. यावेळी मोर्चेकरी महिलांनी पोलिसांच्या विरोधात घोषणा दिल्या आणि अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी करत ठाण्यासमोर ठिय्या मांडला.
या मोर्चात भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदीप पाटील खंडापूरकर, सोनाली गुळभिले, माधुरी पाटील, राणी स्वामी, रामप्रसाद दत्त, यांच्यासह परिसरातील महिला व नागरिकांचा सहभाग होता.