नोंदणी महानिरीक्षकांच्या परिपत्रकामुळे प्लॉट अथवा मालमत्तेचे लेआऊट मंजूर केल्यानंतरच त्याची नोंदणी करण्यात येईल, असे दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदणी अधिकारी म्हणत आहेत. त्यामुळे शहर व तालुक्यातील ८० टक्के मालमत्ताधारकांना या परिपत्रकाचा त्रास होत आहे. परिणामी, दोन महिन्यांपासून मालमत्तेची दस्त नोंदणी बंद झाली आहे. या परिपत्रकात सुधारणा करुन दस्तनोंदणी पूर्ववत सुरु करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या परिपत्रकाच्या विरोधात २१ सप्टेंबरपासून दुय्यम निबंधक कार्यालयाशी संबंधित सर्व कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. यासंदर्भात दुय्यम निबंधकांना निवेदनही देण्यात आले. निवेदनावर ॲड. एस. जी. शेख, सुरेश सूर्यवंशी, आर. आर. पाटील, गफुर सय्यद, पांडुरंग जगताप, संजय भुरे, ॲड. व्ही. एन. शेंबाळे, डी. एम. कांबळे, सुभाष मुळके, श्रीधर बडगिरे, काशीनाथ भालके, सिकंदर शेख, पी. व्ही. शेळके, विशाल हमने आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.