तालुक्यातील अतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रास अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. पंडित सूर्यवंशी, अतनूरचे सरपंच चंद्रशेखर गव्हाणे, माजी सरपंच रमेश बोडेवार, मुक्तेश्वर येवरे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल बारसुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुळे, डॉ. चव्हाण व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी केंद्रे यांनी लसीकरण करून घेतलेल्यांशी संवाद साधला. तसेच उर्वरित नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही केले. अतनूर प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा प्रशासनाकडून २ हजार १४० लसी देण्यात आल्या होत्या. त्यापैकी १ हजार ७०२ जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंतच्या ॲन्टिजेन तपासण्या ३ हजार ६१२, तर आरटीपीसीआर चाचण्या १ हजार ६२५ झाल्या आहेत. ॲन्टिजेनमध्ये २२०, तर आरटीपीसीआरमध्ये १८४ जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली.
कर्मचा-यांचे उत्कृष्ट कार्य...
अतनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्वांचे काम समाधानकारक आहे. चांगले काम करणाऱ्यांसोबत मी कायम आहे. आरोग्य कर्मचा-यांनी ग्रामीण भागातील रुग्णांना अशाच पध्दतीने चांगली सेवा द्यावी, असेही जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले.