येथील संभाजीराव केंद्रे महाविद्यालयातील रासेयो व नांदेडच्या स्वारातीम विद्यापीठाच्या वतीने आयोजित ऑनलाइन राष्ट्रीय वेबिनारमध्ये ते बोलत हाेते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी.टी. लहाने होते. यावेळी स्वारातीम विद्यापीठाच्या रासेयोचे संचालक डॉ. शिवराज बोकाडे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. बोकाडे म्हणाले, युवकांनी समाजातील अनिष्ठ परंपरा, चालीरितींना झुगारून पुढे येऊन काम करण्याची गरज आहे. या राष्ट्रीय वेबिनारमध्ये देशातील २५४ जणांनी नोंदणी करून ऑनलाइन सहभाग नोंदविला होता. यशस्वितेसाठी रासेयोचे कार्यक्रमाधिकारी सहा. प्रा. जे.एल. जायेवार, प्रा.डॉ. एन.पी. कुडकेकर, डॉ. एम.एन. कांबळे, सहा. प्रा. महेश कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्रा. जे.एल. जायेवार यांनी, सूत्रसंचालन प्रा.डॉ. एन.पी. कुडकेकर यांनी केले. आभार सहा. प्रा. महेश कुलकर्णी यांनी मानले.
तरुणांनी आत्मनिर्भर होणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:19 AM