श्री हावगीस्वामी महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. आप्पाराव काळगापुरे होते. यावेळी प्रा. एस. टी. कोळीकर, प्रा. डी. एस. मुंदडा उपस्थित होते. प्रा. भालके म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी संघर्ष केला. एक उत्तम प्रशासक, प्रजाहितदक्ष राजा म्हणून त्यांनी १७व्या शतकात जे कार्य केले, ते डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करणे नितांत गरजेचे आहे. अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ. काळगापुरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम अभियंता होते. गड-किल्ले पाहिल्यानंतर त्याची जाणीव व्हायला लागते. दूरदृष्टी असलेल्या छत्रपती शिवरायांचे विचार प्रेरणा देणारे व आत्मविश्वास वाढविणारे आहेत. प्रा. जे. डी. संपाळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. ओ. एस. स्वामी यांनी आभार मानले.
तरुणांनी शिवरायांचा आदर्श घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 4:36 AM