आजच्या धावपळीच्या जीवनात कामाचा स्ट्रेस घालवण्यासाठी प्रत्येकालाच शांतता हवी असते. त्यासाठी अनेकजण कुठेतरी बाहेर जाऊन वेळ घालवण्याचा प्लॅन आखतात. पण त्याच त्याच ठिकाणांवर जाऊन अनेकांना ना शांतता मिळत ना त्यांचा स्ट्रेस दूर होत. पण आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांची माहिती देणार आहोत, जिथे तुम्हाला शांतताही मिळेल आणि आपण दुस-या जगात आलो की, काय असंही तुम्हाला वाटेल.
1) जर तुम्ही कधी स्वप्न पाहिलं असेल की, तुम्ही हिरव्यागार डोंगरातून चालत आहात. तुमच्याकडे त्रास द्यायला फोनही नाहीये. कारण तिथे सिग्नल नाहीये. तर ते ठिकाण नागालॅंडमधील झुकोवू व्हॅली असू शकतं. इथे सगळीकडेच हिरवीगार डोंगरं आहेत. त्यामुळे इथली सफर तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरु शकते.
2) हिमाचल प्रदेशातील तोश हे गावही तुमच्यासाठी ड्रीम ट्रीप ठरु शकतं. कारण इथे तुम्हाला हवी असलेली शांतता नक्की मिळेल. हे ठिकाण नक्कीच तुम्हाला स्वप्नवत वाटणारंच असणार आहे. त्यामुळे पुढच्यावेळी तुम्ही इथेही जाण्याचा प्लॅन करु शकता.
3) जर तुम्हाला निळ्या पाण्याच्या शोधत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट ठरेल. हे ठिकाण आहे कर्नाटकातील गोकरणा. इथे तुम्हाला कधीही न पाहिला इतका स्वच्छ समुद्र बघायला मिळेत.
4) जर तुम्हाला ऐतिहासिक ठिकाणी जाण्याची आवड असेल आणि शांतता हवी असेल जर मध्यप्रदेशातील ओर्चा हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य ठरेल. इतिहासाची माहिती मिळण्यासोबतच इथे तुम्हाला वेगळीच शांतता अनुभवायला मिळणार आहे.
5) लक्षद्वीप या ठिकाणाला भेट देणा-यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये चांगलीच वाढली आहे. त्यामुळे दुसरीकडे जाऊन पैसे खर्च करण्यापेक्षा या ठिकाणाला भेट दिलेली कधीही फायद्याची ठरेल.
6) सुंदर रस्ते, सुंदर घरं आणि सुंदर समुद्र यासाठी पॉंडेचेरी प्रसिद्ध आहे. त्यामुळे नेहमीच्या कंटाळलेल्या ठिकाणांना स्किप करुन हे ठिकाण तुम्हाला वेगळा आनंद देऊ शकतं.
7) कर्नाटकातील हंपी या ठिकाणाला एकदा भेट दिल्यावर तुम्ही पुन्हा पुन्हा इथे याल. कारण इथे सुंदर मंदिरं, खळखळणारी नदी, हिरवीगार जंगलं तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. त्यामुळे इथे न चुकता एकदा तरी भेट द्यायला हवी.