(image credit-Vega)
कोरोना व्हायरसच्या माहामारीमुळे लोकांच्या शारीरिक मानसिक स्थितीसह आर्थिक स्थितीवर परिणाम होत आहे. अनेकांना लॉकडाऊनमध्ये कामधंदे ठप्प पडल्यामुळे पैशांची गरज भासत आहे. तर अनेकांचे पैसे संपायला आता सुरूवात झाली आहे. कोरोनाच्या माहामारीप्रमाणे जीवनात असे अनेक प्रसंग येऊ शकतात. ज्यावेळी तुम्हाला तुम्ही वाचवलेल्या पैशांची गरज भासू शकते. अचानक इमजेंन्सी स्थितीत पैसे नसतील तर तुम्हाला इतरांकडे हात पसरावे लागू शकतात. आज आम्ही तुम्हाला काही खास टीप्स सांगणार आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही पैशांची बचत करू शकता.
इमजेंन्सी फंड तयार ठेवा
सध्या लॉकडाऊनच्या स्थितीत बरेच लोक घरात असून विनाकारण बाहेर जाणं टाळत आहेत. अशा स्थितीत अचानक पैशांची मदत लागल्यास तुम्ही इमरजेंन्सी फंडचा वापर करू शकता. कमीतकमी सहा महिने हा फंड तयार केल्यास तुम्हाला कठीण प्रसंगात फायदा मिळू शकतो.
कर्ज घेऊ नका
कितीही गरज असेल तरी कर्ज घेऊ नका. कारण कर्जाचं ओझं नेहमीसाठी तुमच्यासोबत राहत असतं. जर तुम्ही आधी कोणतंही कर्ज घेतलं असेल तर लवकरता लवकर क्लिअर करा. क्रेडिट कार्डऐवजी कॅश पेमेंट किंवा डेबिट कार्डने पैशांची देवाण घेवाण करा.
आपली कौशल्य वाढवा
लॉकडाऊनमध्ये वेळचंवेळ असल्यामुळे तुम्ही तुमच्यातील गुणांना ओळखू शकता. इंटरनेटवर अनेक ऑनलाईन कोर्स उपलब्ध आहेत. यावेळत तुम्ही तुमचा सीव्ही अपडेट करा. पण नोकरी मिळवून देत असलेल्या साईट्सवर तुम्ही आपलं प्रोफाईल अपडेट करायला हवं. त्यामुळे तुम्हाला एखादी संधी उपलब्ध होण्याची शक्यता असते. कारण कोरोनाच्या महामारीमुळे जॉब मिळणं कठीण होऊ शकतं. म्हणून तुमचा सिव्ही लिक्डंइन प्रोफाईवर अपडेट करा. जॉब व्यतिरिक्त इतर कंपनीची माहिती घ्या,
अनावश्यक खर्च टाळा
स्वतःचं एक बजेट तयार करा आणि त्यानुसार खर्च करा. कारण अनावश्यक खर्च केल्यास गरजेच्यावेळी तुमच्याकडे पैसे कमी पडू शकतात. पैश्याच्या बाबतीत खूप सावधगीरी बाळगणं गरजेचं आहे. विचार केल्याशिवाय कुठेही आपले पैसे गुंतवू नका.
घरबसल्या आटपून घ्या 'ही' कामं, लॉकडाऊननंतर जॉब मिळवण्यासाठी ठरतील उपयोगी
तुम्ही घरून काम करता? तासंतास बेडवर बसून काम करणं पडू शकतं महागात, कसे ते वाचा...