लंडन : जगात वैद्यकीय क्षेत्र झपाट्याने प्रगती करत आहे. आता ब्रिटनमध्ये तीन लोकांच्या डीएनएसह बाळाचा पहिल्यांदाच जन्म झाला आहे. या प्रक्रियेत ९९.८ टक्के डीएनए एका पालकाकडून आणि एक तिसऱ्या महिलेकडून घेण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान अत्यंत धोकादायक मायटोकॉन्ड्रियल रोगांना रोखण्याचा प्रयत्न आहे.
ब्रिटनमध्ये अनेक मुले मायटोकॉन्ड्रियल या आजाराने जन्माला येतात. नवजात बालकांना या आजारापासून वाचवण्यासाठी हा तीन व्यक्तींचा डीएनए वापरण्याचा एक यशस्वी मार्ग असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.प्रजनन नियामकाने पुष्टी केली आहे की, इंग्लंडमध्ये प्रथमच तीन लोकांच्या डीएनएचा वापर करून एका मुलाचा जन्म झाला आहे. हा आजार आईकडून मुलाला आनुवंशिकरीत्या प्राप्त होतो. त्यामुळे माइटोकॉन्ड्रियल डोनर उपचार पद्धती (एमडीटी) वापरली जाते. ही आयव्हीएफचे सुधारित स्वरूप आहे. यात वेगळ्या स्त्रीच्या अंडकोषातील मायटोकॉन्ड्रिया वापरले जाते, जी हानिकारक उत्परिवर्तनांपासून मुक्त असते.
राज्यातील धरणांमध्ये किती आहे पाणीसाठा?
कोणत्याही धोक्याशिवाय इंग्लंडच्या ईशान्येकडील न्यूकॅसल क्लिनिकमध्ये मुलाचा जन्म झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जरी बाळांमध्ये ९९.८ टक्क्यांपेक्षा जास्त डीएनए आई आणि वडिलांकडून येतात, तरी या प्रक्रियेमुळे “तीन पालक बाळ” असा शब्दप्रयोग करण्यात येत आहे.
किती बाळांना विकार
उत्परिवर्तीत मायटोकॉन्ड्रियाचा फक्त एक छोटासा भाग वारशाने मिळतो. परंतु इतरांना गंभीर तसेच घातक रोग होऊ शकतात. ब्रिटनमध्ये ६००० पैकी एक बाळ या विकारांनी ग्रस्त आहे.
मेंदू, हृदय, स्नायू आणि यकृत होते निकामी
मानवाच्या २०,००० जीन्सपैकी बहुतेक जीन्स शरीरातील जवळजवळ प्रत्येक पेशीच्या केंद्रकामध्ये गुंडाळलेली असतात. परंतु प्रत्येक केंद्रकाभोवती ठिपके असलेले हजारो मायटोकॉन्ड्रिया त्यांच्या स्वतःच्या जनुकांसह असतात.
मायटोकॉन्ड्रियाचे नुकसान करणारे उत्परिवर्तन मात्र घातक असते. बाधित मूल जसजसे वाढत जाते तसतसे मेंदू, हृदय, स्नायू आणि यकृत खराब होऊ शकतात.
पहिला प्रयोग अमेरिकेत...
एमटीडी पद्धत वापरून मुलांना जन्म देणारा इंग्लंड हा पहिला देश नाही. या तंत्राद्वारे २०१६ मध्ये अमेरिकेतील जॉर्डन शहरात एका मुलाचा जन्म झाला होता.