मुंबईः दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी नववर्षदिनी अर्थात साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सगळे नव्याा संकल्पांची गुढी उभारणार आहोत. या गुढीचं पूजन केल्यानंतर वातावरणात एक वेगळंच चैतन्य निर्माण होतं. यंदा गुढीपूजनावेळी गुढीची आरती म्हणून प्रसन्नतेचा अनुभव घेता येईल.
आरती गुढीची
गुढी उभारू चैत्र मासि प्रतिपदा ही तिथीआरती करुनि वसंत ऋतुचा महिमा वर्णु किती
विश्वनिर्मिती ब्रह्मा करितो ब्रह्मपुराणि असेअयोध्येसी वनवासाहुनि राम पुन्हा परतसे
गुढ्या तोरणे रांगोळ्यांनी स्वागत ते करितीआरती करुनि वसंत ऋतुचा महिमा वर्णु किती
माधव तसे मधुमास ही वेदातील नावेपंचांगाचे पूजन सर्वहि करिती मनोभावे
सरस्वतीस गंध आणिक पाटीही पुजितीआरती करुनि वसंत ऋतुचा महिमा वर्णु किती
साखरमाळ कडुलिंबाची पाने फुलमाळागडू चांदीचा रेशमी वस्त्र कुंकु केशर टिळा
आदराने ब्रह्मध्वज या गुढीस संबोधितीआरती करुनि वसंत ऋतुचा महिमा वर्णु किती
पिशाच्च जाई दूर पळोनि कडुलिंबाचा टाळाकडू रसाचे सेवन करू या गूळ जिरे घाला
स्मिता सांगे सण हा पहिला वर्षाचा करितीआरती करुनि वसंत ऋतुचा महिमा वर्णु किती
गुढी उभारू चैत्र मासि प्रतिपदा ही तिथीआरती करुनि वसंत ऋतुचा महिमा वर्णु किती
सौजन्यः सोशल मीडिया