- रीना चव्हाणपावसाच्या दमदार हजेरीने निसर्ग हिरवाईने नटला आहे. मनाला प्रफुल्लित करणाºया या हिरवाईमुळे आपली मनेसुद्धा चिंब झालीत. पावसात भिजण्याचा एक वेगळाच आनंद असतो. त्यामुळेच खास पिकनिकला जायचे प्लॅन आखले जातात. आबालवृद्धांपासून सगळेच जण पावसाचा मनमुराद आनंद लुटतात; पण पावसाळ्यात कॉलेज, कार्यालयात वा कुठे बाहेर जाताना काय कपडे घालायचे? असा प्रश्न पडतो. कारण ट्रेन, बसच्या प्रवासाबरोबर रस्त्यात साचलेले पाणी, चिखल यामुळे चांगले कपडे खराब होण्याची शक्यता अधिक असते. तसेच लाइट वा आॅफ व्हाइट रंगाच्या कपड्यांवर चिखल उडाल्यास त्याचे डाग निघत नसल्याने कोणते कपडे घालावेत, असा प्रश्न पडतो. त्यामुळे या काळात फिकट रंगाऐवजी गडद कपडे म्हणजे लाल, पिवळा, हिरवा, नारंगी आदी रंगाचा वापर करावा.1कॉलेजला जाताना इंडोवेस्टर्न लूकबरोबर केप्री, लेगिंग्ज, शॉर्ट पॅन्टवर कलरफुल स्टाइलिश टॉप उठून दिसतात; पण शक्य असल्यास जिन्स घालणे टाळावे. कारण ती भिजली की लवकर सुकत नसल्याने त्वचेचे विकार होण्याची शक्यता असते.2पावसाळ्यात वातावरणात एक प्रकारचा दमटपणा असतो. त्यामुळे कपडे लवकर सुकत नाहीत. त्यामुळे अंगाला चिपकणारे कपडे घालणे टाळावेत. हलके, स्टेचेबल नाहीतर कॉटनच्या कपड्यांचा प्राधान्याने वापर करावा. जेणेकरून ते लवकर सुकतील.3इतर ऋतूंबरोबर पावसाळ्यातसुद्धा इतरांपेक्षा आपण उठून दिसावे, असे वाटत असेल तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या डिझाइन्स, रंगाच्या स्कार्प मिळतात, त्याचा वापर करू शकता. टॉप, कुर्तीवर घेतल्यास ते उठून दिसतात.4सलवार- कुर्ती वापरत असला तर सलवार डार्क रंगाची घातल्यास त्यावर चिखल वा पाणी उडाल्याने त्याचे डाग दिसणार नाही; पण त्यावर कुर्ती ब्राइट नाहीतर मिसमॅच घालावी. मोठी प्रिंंट असलेले टॉप, कुर्तेही पावसाळ्यात उठून दिसतात.5पावसाळा असला म्हणून काय झाले, या कूल वातावरणात थोडीशी रंगसंगती व कोणते कपडे घालायचे याबाबत शक्कल लढविली तर तुम्हीसुद्धा कूल व्हाल.
मान्सून फॅशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:54 AM