- अमित सारडा, वेलनेस अँड ब्युटी एक्स्पर्टआपल्या सुगंधी गुणधमार्मुळे चंदनाच्या झाडाची ओळख प्राचीन काळापासून आहे. या झाडापासून मिळविलेले तेल त्यातल्या समृद्ध, उष्म सुगंधामुळे फार पूर्वीपासून वापरात आहे. अनेक घरगुती उपचारांसाठी आणि त्वचेचे दोष दूर करण्यासाठी चंदनाचा वापर केला जातो. परफ्युम्स, पावडर्स, चेह-याला लावण्याच्या क्रीम्स आणि मास्क यांच्या निर्मितीतील चंदन हा एक प्रमुख घटक आहे. रसायनमुक्त असणारे हे नैसर्गिक उत्पादन त्वचेच्या समस्यांवर रामबाण उपाय आहे.चंदनामध्ये अॅरोमाथेरपीचे गुणधर्म निसर्गत:च आहेत आणि त्यापासून तयार केलेल्या तेलात जिवाणूविरोधी घटक आहेत. हे तेल त्वचेसाठी, तसेच केसांसाठी उपयुक्त आहे. साबणामध्ये चंदनाचा वापर केला असेल, तर त्यामुळे त्वचेवरील घाण, अस्वच्छ घटक नष्ट होतात, त्वचेची रंध्रे मोकळी होतात. त्वचा उजळते, त्वचेच्या पेशींना नवजीवन मिळते आणि मऊ, तेजस्वी त्वचा तुम्हाला प्राप्त होते. चंदनाच्या सौम्य, मनमोहक सुगंधाचे गुणधर्म त्यापासून तयार केलेल्या साबणातही उतरतात. त्यामुळे त्वचाही नितळ आणि कोमल राहते.मसाजसाठी वापरल्या जाणाºया तेलात चंदनाच्या तेलाचा वापर केला, तर तुमचा तणाव हलका करण्यास त्याचा लाभ होतो. त्यामुळे तुम्हाला तत्काळ ऊर्जा मिळते. मन आणि शरीराला शांती मिळते. हे तेल एक मॉइश्चरायझर म्हणूनही उपयुक्त ठरते. त्याशिवाय हे तेल तुमच्या त्वचेला जिवाणूविरोधी कवच मिळवून देते. त्यामुळे तुमची त्वचा तेजस्वी, आर्द्र, डागरहित आणि सुंदर होते. या तेलाचे काही थेंब आंघोळीच्या गरम पाण्यात टाकले असता, तजेल्याचा अनुभव येतो. तुमच्या आवडत्या बाथ सॉल्टमध्ये ते तेल मिसळावे. त्वचेच्या स्क्रबिंगसाठी ते फायदेशीर ठरते. त्वचा अधिक निरोगी दिसून येते.चंदनामुळे तुमच्या केसांचे नुकसान टळते आणि केसांना आतून ओलावा मिळतो. शॅम्पू बार वापरत असाल, तर संपूर्ण केसावर त्याचा बोटांनी थर पसरवा. आठवड्यातून दोन-तीन वेळा ही कृती केल्यास तुमचे केस अधिक आकर्षक होतील. त्यांना नवजीवन प्राप्त होईल.>साबणामध्ये चंदनाचा वापर केला असेल, तर त्यामुळे त्वचेवरील घाण, अस्वच्छ घटक नष्ट होतात, त्वचेची रंध्रे मोकळी होतात. त्वचा उजळते, त्वचेच्या पेशींना नवजीवन मिळते आणि मऊ, तेजस्वी त्वचा तुम्हाला प्राप्त होते. चंदनाच्या सौम्य, मनमोहक सुगंधाचे गुणधर्म त्यापासून तयार केलेल्या साबणातही उतरतात. त्यामुळे त्वचाही नितळ आणि कोमल राहते.
त्वचा आणि केसांच्या काळजीसाठी चंदन, त्वचेच्या समस्यांवर रामबाण उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 2:36 AM