सिंधुदुर्गनगरी दि. २६ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १३.२८ मी. मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात १७८७.४७ मि. मि. सरासरी पाऊस झाला आहे.
गेल्या चोवीस तासातील तालुकानिहाय पाऊसदोडामार्ग-१६, सावंतवाडी -२४, वेंगुर्ला- ५, कुडाळ -१५.२, मालवण -१४, कणकवली -११, देवगड- २, वैभववाडी -१९.कोर्ले-सातंडी पाणलोट क्षेत्रात २२ मि.मि. पाऊसकोर्ले-सातंडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात २२ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. या पाणलोट क्षेत्रात आजपर्यंत १६३५ मि.मि. एकूण पाऊस झाला असून धरणात २५.५६४0 द.ल.घ.मी. पाणी साठा झाला आहे. देवघर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात १५ मि.मी. एकूण पाऊस १९२0.३0 मि.मि. तिलारी आंतरराज्य ९.४0 मि.मि. एकूण पाऊस २५१0 मि.मि. झाला आहे. या धरणात अनुक्रमे ७0.९१९0 द.ल.घ.मी व ३६४.१४५0 द.ल. घ. मी पाणीसाठा झाला आहे.