आईच्या प्रियकराने पुलावरून ढकलले, 13 वर्षांच्या मुलीचा पाईपला लटकून पोलिसांना फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 07:13 AM2023-08-08T07:13:00+5:302023-08-08T07:13:14+5:30
पोलिसांनी सांगितल्यानुसार, मुलीने रात्रीच्या अंधारात पाइपला लटकलेल्या अवस्थेत पँटच्या खिशातून मोबाइल काढून १०० क्रमांकावर फोन केला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता लटकलेल्या मुलीची सुटका केली.
अमरावती : आईच्या लिव्ह-इन पार्टनरने पुलावरून गोदावरी नदीत ढकलल्यानंतर एका प्लास्टिकच्या पाइपला लटकून १३ वर्षीय मुलीने कसाबसा स्वतःचा जीव वाचविल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशच्या कोनसीमा जिल्ह्यात घडली. तिचे फोटो व्हायरल झालेत.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, मुलीने रात्रीच्या अंधारात पाइपला लटकलेल्या अवस्थेत पँटच्या खिशातून मोबाइल काढून १०० क्रमांकावर फोन केला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता लटकलेल्या मुलीची सुटका केली.
कीर्तनाने पोलिसांना सांगितले की, रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास तिच्या आईचा लिव्ह-इन पार्टनर यू. सुरेश याने तिच्यासह आई सुहासिनी (३६) आणि सावत्र बहिण जर्सी(१) यांना पुलावरून ढकलून दिले. शनिवारी सायंकाळी त्याने सर्वांना खरेदीसाठी कारमधून राजा महेंद्रवरमला नेले होते. खरेदीनंतर रात्रभर वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेला. रावुलापलेम गौथमी ब्रिजवर पोहोचल्यावर सेल्फीसाठी खाली उतरण्यास सांगितले. तो त्यांच्यासोबत पुलाच्या काठावर बसला आणि अचानक त्यांना नदीत ढकलले.
कीर्तनाची आई, बहीण नदीत वाहून गेले, पण कीर्तना एका प्लास्टिकच्या पाइपला घट्ट पकडून लटकून राहिली.
मुलीला बाहेर काढल्यानंतर पाणी देण्यात आले.
त्यानंतर तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
दोघींना शोधण्यासाठी पोलिसांनी एक टीम तयार केली तर दुसरी टीम आरोपीच्या शोधात आहे. दरम्यान, आई-बहीण वाहून गेल्यावरही कीर्तनाच्या धाडसामुळे पोलिसही आश्चर्यचकित झाले होते.
मतभेदामुळे...
n गुंटूर जिल्ह्यातील ताडेपल्ली येथील सुहासिनी मतभेदांमुळे पतीपासून विभक्त झाली
होती. पहिल्या लग्नापासून
एक मुलगी (कीर्तना)
असलेली ही महिला प्रकाशम जिल्ह्यातील दरसी येथील सुरेशच्या संपर्कात आली.
n दोन वर्षांपासून ते एकत्र राहत होते. सुरेश आणि सुहासिनीमध्ये नुकतेच
मतभेद झाले होते आणि त्याने तिला आणि दोन्ही मुलींना संपवण्याची योजना आखली.