मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यात कचरा संग्रहण केंद्रात तीन मृतदेह सापडले आहेत. येथे पुरामुळे आलेल्या मातीत हे मृतदेह दबलेले होते. हे तिन्ही मृतदेह एकाच कुटुंबातील व्यक्तींचे असावेत, असा प्रशासनाचा अंदाज आहे. दरम्यान, या मृतदेहांची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. हे कचरा संग्रहण केंद्र चंबळ नदीच्या किनाऱ्यावर बनलेलं आहे. ही घटना घाटाबिल्लोद गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमध्ये संपूर्ण परिसरात खळबळ उडालेली आहे.
दुसरीकडे धारमधील बाछनपूर गावात तलावात बुडाल्याने दोन मुलांचा मृत्यू झाला. त्यानंतर गावात शोकाचं वातावरण पसरलेलं आहे. बाछनपूरजवळ असलेल्या तलावामध्ये १४ वर्षांचा आयुष आणि १५ वर्षांचा यशवंत आंघोळीसाठी गेले होते. त्याचदरम्यान, ते आंघोळ करता करता ते खोल पाण्यात गेले. तिथे ते बुडाले.
या घटनेची माहिती मिळताच परिसरात आरडा-ओरडा सुरू झाला. ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात तलावाजवळ पोहोचले. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात पाठवले. तहसीलदारही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना मदतीचं आश्वासन दिलं आहे.