शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

कूनो नॅशनल पार्कमध्ये दोन महीन्यांत 6 चित्ते दगावले, उष्णता की पोषणाचा अभाव, कारण काय ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 3:56 PM

गेल्या 2 महिन्यात एकाण 6 चीत्त्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या 17 चित्ते शिल्लक आहेत.

भारत सरकारचा 'प्रोजेक्ट चीता' चित्त्यांसाठी वाईट स्वप्न ठरत आहे. मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये गुरुवारी (25 मे) आणखी दोन शावकांचा मृत्यू झाला आहे, तर एका पिल्लाची प्रकृती चिंताजनक असून त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. यापूर्वीही एका पिल्लाचा मृत्यू झाला होता. ही सर्व पिल्ले मादी चित्ता 'ज्वाला'ची आहेत. 

या तीन शावकांच्या मृत्यूसह आफ्रिकन देशातून भारतात आलेल्या एकूण 6 चित्त्यांचा गेल्या 2 महिन्यांत मृत्यू झाला आहे. पहिले 3 चित्ते वेगवेगळ्या कारणांमुळे मरण पावले. कुनो नॅशनल पार्कने जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, 23 मे हा हंगामातील सर्वात उष्ण दिवस होता. जसजसा दिवस सरत गेला तसतसा उष्णता वाढत गेली आणि तापमान 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आणि ज्वालाच्या शावकांची प्रकृती ढासळत राहिली. 

आजारी पिल्लाला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्याला किमान एक महिना निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत त्याच्या प्रकृतीत सुधारणा आहे. पण पूर्णपणे ठीक नाही. या पिल्लाला 1 महिना आई ज्वालापासून दूर ठेवण्यात येणार आहे. ज्वालाची सर्व पिल्ले अतिशय कमकुवत जन्माला आली होती, असेही सांगण्यात आले.

मरण पावलेली चित्त्याची पिल्ले सुमारे आठ आठवड्यांची होती. आठ आठवड्यांची पिल्ले साधारणपणे जिज्ञासू असतात आणि सतत आईच्या मागे लागतात. ही पिल्ले 8-10 दिवसांपूर्वी चालायला लागली होती. चित्ता तज्ज्ञांच्या मते, आफ्रिकेत चित्ताच्या शावकांचे जगण्याचे प्रमाण साधारणपणे फारच कमी आहे. शवविच्छेदन प्रक्रिया मानक प्रोटोकॉलनुसार केली जात आहे.

साशा, उदय आणि दक्ष यांचाही मृत्यू झाला आहेनामिबियातून भारतात आलेल्या चित्त्यांपैकी एक असलेल्या साशाचा 27 मार्च रोजी मूत्रपिंडाशी संबंधित आजारामुळे मृत्यू झाला. यानंतर उदयचा 13 एप्रिल रोजी कार्डिओपल्मोनरी फेल्युअरने मृत्यू झाला. यानंतर मादी चित्ता दक्षाचा दुसऱ्या चित्त्याशी झालेल्या भांडणात 9 मे रोजी मृत्यू झाला. सध्या आफ्रिकेतून भारतात आणलेल्या 20 चित्तांपैकी 17 आता शिल्लक आहेत. सात दशके नामशेष झाल्यानंतर देशात पुन्हा एकदा चित्त्यांची संख्या वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, चित्त्यांच्या मृत्यूनंतर 11 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारCentral Governmentकेंद्र सरकारDeathमृत्यू