Snake in Car Madhya Pradesh :साप पाहिला किंवा नावही काढले तरी अनेकजण घाबरतात. अशावेळी कल्पना करा की, तुम्ही कार चालवत आहात आणि तुम्हाला कारमध्ये भला मोठा साप दिसला तर? असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशातील सिवनीमध्ये घडला आहे. हैदराबादमधील कुटुंब कारने उत्तर प्रदेशला जात होते. कारमध्ये महिला आणि लहान मुलांसह 7 जण होते.
सुमारे 500 किमी प्रवास केल्यानंतर कारमध्ये बसलेल्या एका तरुणाला साप दिसला. त्याने तात्काळ ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. सुरुवातीला ड्रायव्हरलाही त्याच्या बोलण्यावर विश्वास वाटला नाही, पण जेव्हा त्याने स्वतःच्या डोळ्याने साप पाहिला, तेव्हा त्याचा थरकाप उडाला. मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपाजवळ वाहन तात्काळ थांबवून सापाबाबत माहिती देण्यात आली.
त्यानंतर पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने सर्प मित्राला फोन केला आणि सर्प मित्राने सुमारे 15 मिनिटांच्या धडपडीनंतर 6 फूट लांब सापाला बाहेर काढले. साप बाहेर आल्यानंतर कारमधील कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.