हृदयद्रावक! २ चिमुकल्यांनी डोळ्यादेखत आई-वडील गमावले; भीषण अपघातात जवान-पत्नीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 05:37 PM2023-08-06T17:37:13+5:302023-08-06T17:37:26+5:30

मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

A SAF jawan and his wife died in a bus-car accident in Madhya Pradesh's Bhind district | हृदयद्रावक! २ चिमुकल्यांनी डोळ्यादेखत आई-वडील गमावले; भीषण अपघातात जवान-पत्नीचा मृत्यू

हृदयद्रावक! २ चिमुकल्यांनी डोळ्यादेखत आई-वडील गमावले; भीषण अपघातात जवान-पत्नीचा मृत्यू

googlenewsNext

मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात विशेष सशस्त्र दल (SAF)-१४ बटालियनचा एक जवान आणि त्याच्या पत्नीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुदैवाने त्यांचा मुलगा आणि मुलगी बचावली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जवान आणि त्याच्या पत्नीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. पोलिसांनी बस ताब्यात घेतली असून अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त  होत आहे. अनिरुद्ध सिंग असे मृत जवानाचे नाव आहे.

माहितीनुसार, मेहगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बर्‍हाडजवळ अचानक एक मोठा आवाज आला अन् स्थानिकांना धक्का बसला. आवाज ऐकताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. बस आणि स्विफ्ट कारमध्ये भीषण अपघात झाल्याचे कळताच बघ्यांनी घटनेची माहिती  पोलिसांना दिली. लोकांनी जवळ जाऊन पाहिले असता कारमध्ये चार जण होते. कारमध्ये महिला आणि पुरुषाव्यतिरिक्त दोन मुलेही होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्याच्या कडेला उभी असलेली कार ताब्यात घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना गाडीतून बाहेर काढले. पोलिसांनी तात्काळ चौघांनाही ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवले. पण, रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच पती-पत्नीचा मृत्यू झाला होता. तर मुलगा आणि मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पती-पत्नीचा मृत्यू 
दरम्यान, कारमध्ये मृत व्यक्तीचे ओळखपत्र सापडले आहे. त्यावरून मृत व्यक्ती विशेष सशस्त्र दलात कार्यरत असल्याचे उघड झाले. अनिरुद्ध सिंग असे मृत जवानाचे नाव आहे. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. पोलिसांनी बस देखील ताब्यात घेतली. हा अपघात होताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लोकांनी गाडीची अवस्था पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला.  

 

Web Title: A SAF jawan and his wife died in a bus-car accident in Madhya Pradesh's Bhind district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.